दोन गटातील मारामारीत सहा गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 01:51 AM2017-09-09T01:51:42+5:302017-09-09T01:51:50+5:30

मूर्तिजापूर : येथील जुनी वस्ती खडकपुरा परिसरात ७  सप्टेंबर रोजी रात्री ९.३0 वाजताच्या दरम्यान नगर  परिषदेच्या निवडणुकीच्या जुन्या वादावरून दोन गटात  हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी  दोन्ही गटातील लोकांविरुद्ध शहर पोलीस स्टेशन येथे  विविध कलमान्वये गन्हे दाखल करण्यात आले आहे त. यामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

Six serious attacks in two groups | दोन गटातील मारामारीत सहा गंभीर

दोन गटातील मारामारीत सहा गंभीर

googlenewsNext
ठळक मुद्देमूर्तिजापूर येथील घटना अनेक जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : येथील जुनी वस्ती खडकपुरा परिसरात ७  सप्टेंबर रोजी रात्री ९.३0 वाजताच्या दरम्यान नगर  परिषदेच्या निवडणुकीच्या जुन्या वादावरून दोन गटात  हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी  दोन्ही गटातील लोकांविरुद्ध शहर पोलीस स्टेशन येथे  विविध कलमान्वये गन्हे दाखल करण्यात आले आहे त. यामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
मूर्तिजापूर शहरातील जुनी वस्ती खडकपुरा येथे ७ स प्टेंबर रोजी रात्री ९.३0 वाजताच्या सुमारास जुन्या नगर  परिषद निवडणुकीच्या वादावरून लोखंडी कत्ता, पाइप  आणि लाठी-काठीचा वापर करून झालेल्या  मारामारीमध्ये सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.  जखमीपैकी दोघांना अकोला येथे उपचारार्थ  पाठविण्यात आले आहे. इतरांवर स्थानिक श्रीमती  लदेसा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी दोन्ही गटाकडून दिलेल्या तक्रारीवरून शहर  पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून  त्यांना अटक केली आहे.
यामध्ये फिर्यादी अ. रहेमान अ. समद (५९) रा.  खडकपुरा यांनी दिलेल्या तक्रारीवरून इलियासखान  रहेमतखान, एजाजखान रहेमानखान, मो. अनिस मो.  हनिफ, मो. शकील मो. युनूस, फिरोजखान अजम तखान, शब्बीरखान रहेमतखान, रियाजखान अजम तखान, अफरोजखान अजमतखान, अहमदखान  रहेमतखान, मो. शकील मो. युनूस इतर ८ ते १0 रा.  खडकपुरा यांच्याविरुद्ध ३0७, १४३, १४७, १४८,  १४९, ५0४, ३२३ भादंविप्रमाणे तर रियाजखान अजम तखान (२५) ऑटोचालक याने दिलेल्या तक्रारीवरून  सलिमोद्दीन इमामोद्दीन, कलीमोद्दीन इमामोद्दीन,  जुनेदखान साहेबखान, अ. रहेमान ऊर्फ रम्मू अ. समद  (माजी नगरसेवक), अ. इरशाद अ. रहेमान,  फिरोजखान साहेबखान, जावेदखान साहेबखान, अ.  इम्रान ऊर्फ इन्नू अ. रहेमान, नासीरखान युनूसखान,  इकबालखान अफसरखान, अ. रेहान अ. रहेमान,  युसूफखान युनूसखान, अ. वाजीद अ. रशीद, अ.  मजीद अ. रशीद इतर ८ ते १0 जणांविरुद्ध अप.  २८९/१७ कलम ३0७, १४३, १४७, १४८, १४९,  ५0४, ३२४, ५0६ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात  आले आहेत. पुढील तपास ठाणेदार गजानन पडघन  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष बे तल करीत आहेत. 
-

Web Title: Six serious attacks in two groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.