सहा विशेष रेल्वेगाड्यांना जून अखेरपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:18 AM2021-03-17T04:18:43+5:302021-03-17T04:18:43+5:30

गाडी क्रमांक ०२८१२ अप हटिया -लोकमान्य टिळक टर्मिनस (प्रत्येक शुक्रवार ) या विशेष गाडीचा विस्तार २५ जूनपर्यंत करण्यात आला ...

Six special trains extended till end of June | सहा विशेष रेल्वेगाड्यांना जून अखेरपर्यंत मुदतवाढ

सहा विशेष रेल्वेगाड्यांना जून अखेरपर्यंत मुदतवाढ

googlenewsNext

गाडी क्रमांक ०२८१२ अप हटिया -लोकमान्य टिळक टर्मिनस (प्रत्येक शुक्रवार ) या विशेष गाडीचा विस्तार २५ जूनपर्यंत करण्यात आला आहे. गाडी क्रमांक ०२८११ डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस-हटिया (प्रत्येक रविवार ) या गाडीचा विस्तार २७ जूनपर्यंत करण्यात आला आहे.

गाडी क्रमांक ०२१०२ अप हावडा -लोकमान्य टिळक टर्मिनस (प्रत्येक रविवार,गुरुवार ) या विशेष गाडीला १ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०२१०१ डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस- हावडा (प्रत्येक शुक्रवार,मंगळवार) या गाडीची मुदत २९ जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे.

गाडी क्रमांक ०२८८० अप भुवनेश्वर -लोकमान्य टिळक टर्मिनस (प्रत्येक सोमवार,गुरुवार )ही गाडी आता २८ जूनपर्यंत धावणार आहे.

गाडी क्रमांक ०२८७९ डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस-भुवनेश्वर (प्रत्येक बुधवार,शनिवार )ही गाडी ३० जूनपर्यंत धावणार आहे.

गाडी क्रमांक ०२८६६ अप पुरी -लोकमान्य टिळक टर्मिनस (प्रत्येक मंगळवार ) या गाडीचा विस्तार २९ जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. गाडी क्रमांक ०२८६५ डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस -पुरी (प्रत्येक गुरुवार) या गाडीचा विस्तार १ जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे.

गाडी क्रमांक ०२८५७ अप विशाखापट्टणम -लोकमान्य टिळक टर्मिनस (प्रत्येक रविवार) या गाडीला २७ जूनपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. गाडी क्रमांक ०२८५८ डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस - विशाखापट्टणम (प्रत्येक मंगळवार) या गाडीला २९ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

गाडी क्रमांक ०८५०१ अप विशाखापट्टणम -गांधीधाम (प्रत्येक गुरुवार) ही विशेष गाडी आता २४ जूनपर्यंत धावणार आहे.

गाडी क्रमांक ०८५०२ डाऊन गांधीधाम-विशाखापट्टणम (प्रत्येक रविवार) ही गाडी २७ जूनपर्यंत धावणार आहे.

Web Title: Six special trains extended till end of June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.