खरगपूर विभागात नॉन इंटरलॉकिंग कामाच्या पार्श्वभूमीवर शालीमार, आझाद हिंद एक्स्प्रेससह सहा रेल्वे रद्द
By Atul.jaiswal | Published: June 26, 2024 06:43 PM2024-06-26T18:43:18+5:302024-06-26T18:43:43+5:30
अकोला : पश्चिम बंगालममधील खरगपूर विभागाच्या अंदुल स्टेशनसह संकरेल-संत्रागाछी लिंक लाईनच्या जोडणीच्या संदर्भात अंदुल स्टेशनवर प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन ...
अकोला : पश्चिम बंगालममधील खरगपूर विभागाच्या अंदुल स्टेशनसह संकरेल-संत्रागाछी लिंक लाईनच्या जोडणीच्या संदर्भात अंदुल स्टेशनवर प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंग काम २९ जून ते ८ जुलै २०२४ या कालावधीत केले जाणार आहे. या तांत्रिक कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार असल्याने यामार्गावरून धावणाऱ्या अप व डाऊन ३४ रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये अकोला मार्ग धावणाऱ्या शालीमार, आझाद हिंद एक्स्प्रेससह ६ रेल्वेंचा समावेश असल्याने अकोलेकर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
कोणती गाडी कधी रद्द?
गाडी : रद्द दिनांक
१८०२९ एलटीटी मुंबई-शालीमार एक्स्प्रेस : ४ जुलै ते ६ जुलै
१८०३० शालीमार-एलटीटी मुंबई एक्स्प्रेस : ६ जुलै ते ८ जुलै
१२१२९ पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस : ४ जुलै ते ६ जुलै
१२१३० हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस : ६ जुलै ते ८ जुलै
१२९०५ पोरबंदर-शालिमार एक्स्प्रेस : ४ जुलै
१२९०६ शालीमार-पोरबंदर एक्स्प्रेस : ६ जुलै
१२९४९ पोरबंदर-संत्रागाछी एक्स्प्रेस : ५ जुलै
१२९५० संत्रागाछी-पोरबंदर एक्स्प्रेस : ७ जुलै
२२५१२ कामाख्या-एलटीटी मुंबई एक्स्प्रेस : ६ जुलै
२२५११ एलटीटी मुंबई- कामाख्या एक्स्प्रेस : ९ जुलै
१२१०१ एलटीटी मुंबई-शालीमार ज्ञानेश्वरी एक्प्प्रेस : ६ जुलै
१२१०२ शालीमार-एलटीटी मुंबई ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस : ८ जुलै