गांजा तस्करी प्रकरणात आरोपीस सहा वर्षांचा सश्रम कारावास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 07:14 PM2023-10-04T19:14:47+5:302023-10-04T19:15:54+5:30

न्यायालयाचा निवाडा : आरोप सिद्ध न झाल्याने, तिघांची सुटका

Six years rigorous imprisonment for accused in ganja smuggling case | गांजा तस्करी प्रकरणात आरोपीस सहा वर्षांचा सश्रम कारावास

गांजा तस्करी प्रकरणात आरोपीस सहा वर्षांचा सश्रम कारावास

googlenewsNext

अकोला : गांजा तस्करी प्रकरणात आरोपी मोहम्मद रफिक माेहम्मद हमजा रा. इस्लामपुरा जुने शहर याला ३ रे जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील एम. पाटील यांच्या न्यायालयाने ४ ऑक्टोबर रोजी सहा वर्षांचा सश्रम कारावासासह ४० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली इतर सहकारी तिघा आरोपींविरुद्ध सबळ पुरावे नसल्याने, न्यायालयाने त्यांची सुटका केली.

पिंजर पोलिस स्टेशनअंतर्गत एपीआय सुनील पी. सोळंके यांना गांजा तस्करीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून १३ सप्टेंबर २०२७ रोजी आरोपी मोहम्मद रफिक मोहम्मद हमजा, मंदा शेषराव वानखडे व व्यंकट लक्ष्मी मुसलैय्या रामू हे शेलु बु. गावाकडे येत असताना, त्यांच्याजवळील साहित्याची झडती घेतली असता, मो. रफिक मो. हमजा याच्याकडे ६ किलो ८३२ ग्रॅम गांजा आणि एक मोबाइल, आरोपी मंदा शेषराव वानखडे हिच्याकडून एक मोबाइल जप्त केला.

आरोपींविरुद्ध अमली पदार्थ व सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्याचे (एनडीपीएस) कलम २० (बी) (आयआय) (बी) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. तपासादरम्यान आरोपी मो. रफिक मो. हमजा याने आरोपी गणपत राधाकिसन कनोजिया याच्यासोबत यापूर्वी गांजा खरेदी व विक्रीचे व्यवहार असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास अटक केली. या प्रकरणात न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. आरोपी व्यंकट लक्ष्मी मुसलैय्या रामू हिच्याविरुद्ध सबळ पुरावा नसल्याने तिला निर्दोषमुक्त केले होते. या प्रकरणामध्ये सरकार पक्षाने ६ साक्षीदार तपासले. या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील ॲड. आनंद गोदे यांनी सरकारतर्फे बाजू मांडली. त्यांना कोर्ट पैरवी खाडे व सीएमएस सेलचे पैरवी श्रीकृष्ण पाचपोर यांनी सहकार्य केले.

असा झाला युक्तिवाद, आरोप सिद्ध न झाल्याने दोघांची सुटका
न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सरकार पक्षाने असा युक्तिवाद केला की, इतर गुन्हे फक्त एका व्यक्तीबद्दल किंवा कुटुंबाबद्दल असतात. परंतु प्रस्तुत गुन्हा हा समाज विरोधी आहे. त्यामुळे या प्रकरणात न्यायालयाने पुरावे ग्राह्य मानून आरोपी मोहम्मद रफिक मोहम्मद हमजा यास अमली पदार्थ व सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्यानुसार दोषी ठरवून ६ वर्षे सश्रम कारावास, ४० हजार रुपये दंड, न भरल्यास अतिरिक्त ३ महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली तर त्याचे सहकारी आरोपी मंदा शेषराव वानखडे व गणपत राधाकिसन कनोजिया यांच्याविरुद्ध सबळ पुरावे व आरोप सिद्ध न झाल्याने त्यांची सुटका करण्यात आली.

Web Title: Six years rigorous imprisonment for accused in ganja smuggling case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला