स्कीट, माईमने वेधले प्रेक्षकांचे लक्ष
By admin | Published: October 1, 2015 01:48 AM2015-10-01T01:48:20+5:302015-10-01T01:48:20+5:30
कृषी विद्यापीठ युवा महोत्सवाचा जल्लोषात समारोप.
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत आयोजित युवा महोत्सवाच्या रंगारंग कार्यक्रमात स्कीट, माईम आणि वन अँक्ट प्लेच्या सादरीकरणाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. बुधवारी पार पडलेल्या अंतिम निवड चाचणीने युवा महोत्सवाचा जल्लोषात समारोप करण्यात आला. कृषी महाविद्यालयांतर्गत सोमवार, २८ सप्टेंबर रोजी डॉ. के.आर.ठाकरे सभागृहात आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवाचा दमदार उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्य़ानंतर रांगोळी स्पर्धा, कृषी पेंटिंग स्पर्धा, पोस्टर मेकिंग अशा विविध स्पर्धांनी सर्वांना आकर्षित केले, तर संस्कृतीच्या पाऊलखुणा जपणार्या लोकनृत्यातून विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. युवा महोत्सवाच्या तिसर्या दिवशी बुधवार, ३0 सप्टेंबर रोजी समारोपीय कार्यक्रमात स्कीट, माईम आणि वन अँक्ट प्लेच्या सादरीकरणाने सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कलावंतांच्या सादरीकरणाला दाद देत प्रेक्षकांनी सभागृहात टाळ्य़ांचा कडकडाट करून प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एस.के. अहेरकर होते. स्पर्धेचे परीक्षण दिग्दर्शक मधू जाधव, संतोष काटे, अरुण घाटोळ यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. एस.एस.माने, डॉ. नागदिवे, डॉ. ययाती तायडे, डॉ. पार्लावार, डॉ. वडतकर, डॉ. बोरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर.आर. शेळके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. उमाळे, डॉ. दलाल, डॉ. टोटावार, डॉ. अहेरकर, डॉ. कहाते, डॉ. फड, डॉ. इंगोले, डॉ. गणवीर, ठाकूर, डॉ. धुळे, डॉ. चिंचमलातपुरे, भगुल, डॉ. भोपळे, डॉ. सुनीता सूर्यवंशी, डॉ. प्रज्ञा कदम, डॉ. मंजूषा गायकवाड, शंकरपुरे, परनाटे आदींनी परिश्रम घेतले.