बाप्पांना आज निरोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 01:53 AM2017-09-05T01:53:08+5:302017-09-05T01:53:44+5:30

अकोला जिल्हय़ात गत १२ दिवसांपासून मोठय़ा भक्ति भावाने सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवासह घरोघरी बसलेल्या गणरायाला आज निरोप देण्यात येणार आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी गणेश मंडळांनी जोरात केली असून, यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. बाप्पांच्या विसर्जनासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तयारी पूर्ण केली आहे, तर ही मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे.

Skip to the parents today! | बाप्पांना आज निरोप!

बाप्पांना आज निरोप!

Next
ठळक मुद्देविसर्जन मिरवणूक मार्गावर पथ संचलनअधिकारी-कर्मचार्‍यांची झाली बैठकसीसी कॅमेर्‍यांद्वारे नियंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हय़ात गत १२ दिवसांपासून मोठय़ा भक्ति भावाने सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवासह घरोघरी बसलेल्या गणरायाला आज निरोप देण्यात येणार आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी गणेश मंडळांनी जोरात केली असून, यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. बाप्पांच्या विसर्जनासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तयारी पूर्ण केली आहे, तर ही मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे. मानाच्या गणपतीचे पूजन करून सकाळी १0 वाजता या मिरवणुकीस जय हिंद चौक येथून प्रारंभ होणार आहे. त्यानंतर शहराच्या विविध भागातून गणरायांची वाजतगाजत मिरवणूक झाल्यानंतर गणेश घाटांवर गणरायाचे विसर्जन करण्यात येणार आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी अकोला पोलीस प्रशासनाद्वारे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये ८८३ अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावेश असून, गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला अकोला पोलिसांनी या मार्गावर पोलिसांनी पथ संचलन केले. त्यानंतर अधिकारी व कर्मचार्‍यांची बैठक घेण्यात आली असून, यामध्ये दक्ष राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.
गणेशोत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी सर्व पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखांकडून अधिकारी व कर्मचार्‍यांची मािहती मागितली होती. त्यानुसार बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोमवारी बंदोबस्तासंदर्भात पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस अधीक्षक उमेश माने, पोलीस उपअधीक्षक सुभाष माकोडे यांनी सूचना दिल्या.

Web Title: Skip to the parents today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.