मुख्य सूत्रधाराच्या शोधात पोलीस दारव्हाकडे रवाना
By admin | Published: January 20, 2017 02:14 AM2017-01-20T02:14:52+5:302017-01-20T02:14:52+5:30
नकली नोटांचे प्रकरण; मुख्य सूत्रधार गौतम कोठारी असल्याचे निष्पन्न.
कारंजा लाड, दि. १९-१00 रुपयांच्या नकली नोटा चलणात आणणार्या दोन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले असून, मूख्य सूत्रधार गौतम कोठारीच्या शोधात कारंजा पोलीस स्टेशनचे शोध पथक यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हाकडे गुरुवारी रवाना झाले आहे.
कारंजा पोलिसांनी १00 च्या १0 हजार, २00 रुपयांच्या नकली नोटांसह प्रट्ठोश रुपेश पाटील आणि गोपाल रमेश राठोड (रा. दारव्हा) या दोन आरोपींना अटक केली होती. दरम्यान, मुख्य सूत्रधार गौतम कोठारी असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यास ताब्यात घेण्याकरिता विशेष पथक दारद्वाकडे रवाना झाले आहे. या पथकात पोलीस उपनिरीक्षक भगवान पायघन, धनराज पवार, किशोर चिंचोळकर, अनिल राठोड, आश्विन जाधव यांचा समावेश आहे. तपासकार्यात दारव्हा येथील ठाणेदार अनिलसिंह गौतम सहकार्य करीत आहेत. मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागल्यानंतर मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.