तापमानात किंचित वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:18 AM2021-04-24T04:18:27+5:302021-04-24T04:18:27+5:30
अकोला : जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे तापमानात घट पहावयास मिळत आहे. शुक्रवारी जिल्ह्याच्या तापमानात किंचित वाढ झाली. पारा ...
अकोला : जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे तापमानात घट पहावयास मिळत आहे. शुक्रवारी जिल्ह्याच्या तापमानात किंचित वाढ झाली. पारा ४०.१ अंश सेल्सिअस नोंदविला गेला. तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.----------------------------------------------
गव्हाची आवक घटली!
अकोला : बाजार समितीत गव्हाची आवक सुरू आहे. जिल्ह्यात संचारबंदी असून या संचारबंदीचा परिणाम बाजार समितीत दिसून येत आहे. गव्हाची आवक घटली असून शुक्रवारी १९५ क्विंटल आवक झाली होती. दररोज ५०० क्विंटलच्या जवळपास गव्हाची आवक होत असते.
-----------------------------------------------
उन्हाळी भुईमूग अंतिम टप्प्याकडे !
अकोला : जिल्ह्यात यंदा २ हजार ५९३ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी भुईमूग पेरणी झाली असून पिकाची अंतिम टप्प्याकडे वाटचाल सुरू आहे. कुठे भुईमूग भरण्याच्या, तर कुठे काढणीच्या अवस्थेत येऊन ठेपले आहेत. बार्शीटाकळी तालुक्यात सर्वाधिक भुईमूग लागवड झाली होती.
-----------------------------------------------
सोशल डिस्टन्सिंग पाळून धान्य खरेदी
अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. त्या अनुषंगाने बाजार समितीत सोशल डिस्टन्सिंग पाळत धान्य खरेदी सुरू आहे. दररोज बाजार समितीत निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे, मात्र संचारबंदीचा परिणाम आवकवर पडला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.