चिमुकलीला एचआयव्ही संक्रमित रक्त, चौकशी सुरू; मंत्री राजेश टोपे यांनी घेतली गंभीर दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 08:41 AM2021-09-03T08:41:38+5:302021-09-03T08:41:44+5:30

रक्तपेढीने दात्याकडून रक्त घेताना एचआयव्ही टेस्ट करुन रक्त स्वीकारणे आवश्यक होते.

small girl HIV infected blood, investigation continues; Minister Rajesh Tope took serious note pdc | चिमुकलीला एचआयव्ही संक्रमित रक्त, चौकशी सुरू; मंत्री राजेश टोपे यांनी घेतली गंभीर दखल

चिमुकलीला एचआयव्ही संक्रमित रक्त, चौकशी सुरू; मंत्री राजेश टोपे यांनी घेतली गंभीर दखल

Next

- संजय उमक

मूर्तिजापूर (जि. अकोला) : तालुक्यातील हिरपूर येथील एका आठ महिन्याच्या चिमुकलीला एचआयव्ही संक्रमित रक्त चढविल्याने तिला एचआयव्हीची लागण झाली. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने ३१ ऑगस्ट रोजी प्रकाशित केले. या गंभीर घटनेची दखल घेत, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

तालुक्यातल्या हिरपूर येथील एका आठ महिन्याच्या चिमुकलीला एचआयव्ही संक्रमित रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी नातेवाईकांनी मंत्री टोपे यांच्याकडे बुधवारी तक्रार केली. ‘लोकमत’ने त्याच दिवशी वृत्त प्रकाशित केल्यानंतर या प्रकरणाची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली असून प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. अन्न व औषधी प्रशासन (एफडीए) व स्थानिक आरोग्य विभागाचे अधिकारी चौकशी करतील. येत्या दोन-तीन दिवसांत त्याचा अहवाल प्राप्त होईल. त्यानुसार कारवाई केली जाईल, असे टोपे म्हणाले.

रक्तपेढीने दात्याकडून रक्त घेताना एचआयव्ही टेस्ट करुन रक्त स्वीकारणे आवश्यक होते. त्याचबरोबर ज्या खासगी रुग्णालयात त्या चिमुकलीवर उपचार सुरु होता. त्या रुग्णालयाने रक्ताचे नमुने घेऊन चाचणी करणे आवश्यक होते. यात हलगर्जीपणा झाल्याचे दिसून येते. याची पूर्ण चौकशी केल्यानंतर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

Web Title: small girl HIV infected blood, investigation continues; Minister Rajesh Tope took serious note pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.