स्मार्ट ग्राम तपासणी पथकाची मधापुरीला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:12 AM2021-02-05T06:12:12+5:302021-02-05T06:12:12+5:30
याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुनील मानकर, मुख्य लेख व वित्त अधिकारी विद्या ...
याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुनील मानकर, मुख्य लेख व वित्त अधिकारी विद्या पवार, उपमुख्यकार्यकारी अधिकारी राहुल शेळके, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अघम,पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अनिस खान,मूर्तिजापूर पं.स.गटविकास अधिकारी बाळासाहेब बायस,पंचायत विस्तार अधिकारी विजय कीर्तने,पाणीपुरवठा विभागाच्या कांचन उमाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सर्वप्रथम जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम तपासणी पथकाने मधापुरी ग्रामपंचायतअंतर्गत स्मशानभूमी फळबागेत लागवड केलेल्या सीताफळ वृक्षांची व बांबू, आवळा वृक्षबागेची पाहणी केली. तसेच शहीद जवान प्रल्हाद भोलाजी साव क्रीडांगणाचे उद्घाटन केले. त्यानंतर स्थानिक जि.प. शाळा व नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र,संगणक प्रणाली,अंगणवाडी केंद्र,प्रा.आ.उपकेंद्र आदींची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम तपासणी पथकाच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा याच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी सरपंच प्रदीप ठाकरे यांच्या हस्ते स्मार्ट ग्राम तपासणी पथकाचे स्वागत करण्यात आले. ग्रामसेवक रवींद्र राठोड यांच्याकडून माहिती जाणून घेतली.
सूत्रसंचालन शिक्षक प्रवीण मुरळ यांनी तर अमर ठाकरे यांनी आभार मानले.
याप्रसंगी सरपंच प्रदीप ठाकरे,उपसरपंच रवींद्र सोळंके, सचिव रवींद्र राठोड, तंटामुक्ती अध्यक्ष ठाकरे, संदीप ठाकरे, रवींद्र मोहिते, मिलिंद ठाकरे, धनंजय ठाकरे उपस्थित होते.
फोटो