तस्कर ‘ट्रॅप’मध्ये अडकला; शहरात २८ किलाे गांजा जप्त; रामदासपेठ पाेलिसांनी आवळल्या आराेपीच्या मुसक्या
By आशीष गावंडे | Published: February 22, 2024 09:55 PM2024-02-22T21:55:24+5:302024-02-22T21:56:06+5:30
इतक्या माेठ्या प्रमाणात गांजा सापडल्यामुळे शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
अकाेला: शहरातील अकाेटस्टॅन्ड चाैकात गांजाची तस्करी करणारा आराेपी रामदासपेठ पाेलिसांनी लावलेल्या ‘ट्रॅप’मध्ये अडकला. गुरुवारी पाेलिसांनी तस्कराकडून तब्बल २८ किलाे गांजा जप्त करीत त्याच्या मुसक्या आवळल्या. इतक्या माेठ्या प्रमाणात गांजा सापडल्यामुळे शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
शहरातील अकाेट स्टॅन्ड परिसरात गुरुवारी एक इसम दाेन पांढऱ्या बॅगमध्ये गांजा विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची गुप्त माहिती रामदास पेठ पाेलिस ठाण्याचे ठाणेदार मनाेज बहुरे यांना मिळाली हाेती. त्यानुषंगाने पाेलिस यंत्रणेने अलर्ट हाेत या परिसरात सापळा रचला. पाेलिसांनी लावलेल्या जाळ्यात आरोपी शेख इकाम शेख रशिद (३०)रा. पोळा चौक ह.मु. यास्मीन नगर जमील कॉलनी जवळ नागपुरी गेट, अमरावती अडकला. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न करण्याच्या आत उपस्थित पाेलिसांनी त्याच्यावर झडप घालून त्याच्या ताब्यातुन दोन पांढऱ्या बॅगमधील तब्बल २८ किलो १९३ ग्रॅम गांजा किंमत ४ लक्ष २२ हजार ८९५ रुपये जप्त केला. याप्रकरणी आराेपीविराेधात अप.क १०२/२०२४ कलम ८ (क), २०(ब) एनडीपीएस अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाइ पाेलिस निरीक्षक मनोज बहुरे, सहायक पाेलिस निरीक्षक किशोर पवार, प्रदिप जोगदंड, सदाशिव सुळकर, शेख हसन शेख अब्दुल्ला, किरण गवई, विजय सावदेकर, तोहीदअली काझी, शाम मोहळे, आकाश जामोदे, अतुल बावने, शिवाजी धोत्रे, संतोष सुराशे, पुजा येंदे, माधुरी लाहोळे यांनी केली.
आराेपीला पाेलिस काेठडी
पाेलिसांनी अटक केलेल्या आराेपीला गुरुवारी न्यायालयात सादर केले असता, त्याला एक दिवसाची पाेलिस काेठडी सुनावण्यात आली. दरम्यान, शहरात इतक्या माेठ्या प्रमाणात गांजा घेऊन येणारा हा तस्कर नेमका काेणाला विक्री करणार हाेता, याची उकल हाेण्याच्या दिशेने तपास केला जाणार असल्याची माहिती आहे.