कारमध्ये नाग आढळला; सर्पमित्राकडून जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:16 AM2021-02-08T04:16:55+5:302021-02-08T04:16:55+5:30
वणी रंभापूर : मूर्तिजापूरकडून पळसो बढेकडे जाणाऱ्या कारमधील स्टेअरिंगजवळ कोब्रा जातीचा नाग आढळला. चालकाच्या ही बाब लक्षात आल्याने, त्याने ...
वणी रंभापूर : मूर्तिजापूरकडून पळसो बढेकडे जाणाऱ्या कारमधील स्टेअरिंगजवळ कोब्रा जातीचा नाग आढळला. चालकाच्या ही बाब लक्षात आल्याने, त्याने कार थांबवून सर्पमित्राला पाचारण केले. सर्पमित्राने कारमधील नाग बाहेर काढल्यावर कारमधील लोकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
मूर्तिजापूरकडून पळसो बढेकडे (एमएच १९ एएक्स ६७८६) कारने प्रवास करीत असताना चालकाला स्टेअरिंगजवळ काहीतरी हालचाल दिसली. यावेळी त्याने कार थांबवून पाहणी केली असता, स्टेअरिंगजवळ नाग असल्याचे दिसले. त्यामुळे चालकासह कारमधील प्रवाशांचीसुद्धा भंबेरी उडाली. चालकाने परिसरातील सर्पमित्र कुमार सदाशिव यांना ही माहिती दिली. त्यांनी सर्पमित्र सूरज सदाशिव, निशांत डोंगरे यांच्यासह घटनास्थळ गाठले. कुमार सदाशिव यांनी कारचे पार्ट उघडून स्टेअरिंगजवळ अडकून बसलेला तीन फूट लांबीचा साप बाहेर काढला. त्यांनी हा कोब्रा जातीचा नाग असल्याचे सांगितले. चालकाच्या ही बाब वेळीच लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. सर्पमित्रांनी या नागाला पकडून जंगलात सोडून दिले.
फोटो: