म्हणून अकाेला पश्चिमची जागा साेडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:16 AM2021-02-08T04:16:24+5:302021-02-08T04:16:24+5:30
अकोला गेल्या विधाानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते विजय देशमुख यांनी निवडणुक न लढविण्याचा निर्णय पक्षाला कळविला हाेता त्यामुळे अकाेला ...
अकोला गेल्या विधाानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते विजय देशमुख यांनी निवडणुक न लढविण्याचा निर्णय पक्षाला कळविला हाेता त्यामुळे अकाेला पश्चिम या मतदारसंघात आपल्या पक्षाचा शक्तिपात झाला असावा असा समज आमचा झाला त्यामुळेच अकाेला पश्चिम मतदारसंघाची जागा मित्रपक्षाला साेडली व आम्ही बाळापूरची उमेदवारी घेतली अशा शब्दात राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी विजय देशमुखांची पाठराखण करतानाच गेल्या निवडणुकीत मतदारसंघ बदलामागील सत्य उघड केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद मेळाव्याच्या अंतर्गत रविवारी त्यांनी अकोला महानगर जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले की अकाेल्यात राष्ट्रवादीची ताकद आहे मात्र मध्यंतरीच्या काळात पक्षाच्या कार्यक्रमांना गर्दीच दिसत नव्हती त्यामुळे सहाजिकच त्याचा परिणाम मतांवर झाला. त्यामुळे आता शरद पवार यांच्याशी चर्चा करून नवीन नेतृत्व अकाेला महानगरासाठी दिले आहे त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घेऊन नव्या दमाने काम करणाऱ्या युवकांची फळी तयार करा अशी सूचना महानगरध्यक्ष विजय देशमुख यांना केली. गेल्या निवडणुकीत काय झाले हे आता विसरा ते उगाळत बसू नका. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागण्याचा सल्ला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार अमोल मिटकरी, डॉ. संतोष कोरपे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, माजी आमदार हरिदास भदे, पक्ष निरीक्षक प्रवीण कुटे, डॉ. आशा मिरगे, मंदाताई देशमुख, कृष्णा अंधारे, राहुल डोंगरे, महानगराध्यक्ष विजय देशमुख, कार्याध्यक्ष युसूफ अली, रफिक सिद्धीकी, मनोज गायकवाड, फैजाय खान, अजय रामटेके, बुढण गाडेकर, नितीन झापर्डे, उषा विरक, अ. रहिम पेंटर, देवानंद ताले, रिजवाना, मघा पाचपौर, सोनाली ठाकूर, करण दौंड, दिलीप देशमुख आदींची उपस्थिती होती. प्रांरभी महानगराध्यक्ष विजय देशमुख, कार्याध्यक्ष युसूफ अली, रफिक सिद्धीकी यांनी जयंत पाटील यांचे पुष्पहाराने स्वागत केले यावेळी कोरोना योद्धा म्हणून मनपाचे आरोग्य अधिकारी प्रशांत राजूरकर यांचा सत्कारही करण्यात आला.
....................................
बाॅक्स
पदाधिकाऱ्यांनाे लवकर उठण्याचा आदर्श घ्या
शरद पवार जयंत पाटील हे रात्री उशिरापर्यंत पक्षाच्या कामात व्यस्त असतात त्यामुळे महानगर अध्यक्षांसह सर्वच पदाधिाकाऱ्यांनी नेत्याचा आदर्श समाेर ठेवत लवकर उठावे व जनतेच्या प्रश्नांसाठी अधिकचा वेळ द्यावा, असा सल्ला अन्न औषध प्रशासन मंत्री डाॅ राजेंद्र शिंगणे यांनी दिला अकाेला महापालिका निवडणुकीत विजय देशमुख यांच्या नेतृत्वात यावेळी आपण नक्कीच यश मिळवू असा विश्वास व्यक्त करून प्रत्येकाने वैयक्तिक जबाबदारी समजुन कामाला लागावे असे आवाहन शिंगणे यांनी केले
....................................
पक्ष प्रवेश साेहळाही उत्साहा
माजी आमदार हरिदास भदे, बळीराम सिरस्कार, राहुल डोंगरे अशा नेत्यांमुळे पक्षातील बहूजन नेतृत्व प्रबळ हाेत आहे असे स्पष्ट करत ना. पाटील यांच्या उपस्थितीत यश सावल, आकार गवई, हर्ष मांडलिक, जितू वानखडे, मंगेश इंगळे, अजय पिंगळे, दिलीप वाघमारे,नसिम ठेकेदार, अविनाश कडाळे आदींनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश घेतला.