... म्हणून अयोध्या दौऱ्यात नव्हतो; नाराजीबाबत बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 05:08 PM2023-04-11T17:08:17+5:302023-04-11T17:09:41+5:30

शिंदे फडणवीस सरकारचे सर्व नेते आमदार व खासदार अयोध्या दौऱ्यावर गेले होते.

... So Ayodhya was not on tour; Bachu Kadu spoke clearly about his displeasure | ... म्हणून अयोध्या दौऱ्यात नव्हतो; नाराजीबाबत बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं

... म्हणून अयोध्या दौऱ्यात नव्हतो; नाराजीबाबत बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं

googlenewsNext

अकोला - राज्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार, खासदार, नेते यांनी दोन दिवसीय अयोध्या दौरा केला. या दौऱ्यात अयोध्येतील राम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तर, शरयू नदीकिनारी महाआरतीही केली. यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेतेही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या अयोध्या दौऱ्याला मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह आमदार बच्चू कडूंचीही अनुपस्थिती लक्षवेधी ठरली. त्यामुळे, बच्चू कडू नाराज असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. आता, आमदार कडू यांनी आपल्या नाराजीबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच, मुख्यमंत्री शिंदे हे दबंग नेते आहेत, असेही त्यांनी म्हटले. 

शिंदे फडणवीस सरकारचे सर्व नेते आमदार व खासदार अयोध्या दौऱ्यावर गेले होते. पण, यात शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू नसल्याने संजय राऊत यांनी बच्चू कडू हे नाराज असल्याचं म्हटलं होतं. त्यावर बच्चू कडू यांनी, मी नाराज नसल्याची प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिलंय. सध्या आमच्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने या कामात मी व्यस्त होतो. त्यामुळे अयोध्या दौऱ्यावर जाऊ शकलो नाही, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कामामध्ये सनी देओल आहेत आणि अॅक्शनमध्ये नाना पाटेकर यांच्यासारखे दबंग आहेत. राज्यात असे दबंग मुख्यमंत्री असल्यामुळे नाराज होण्याचं कारण नाही, असे म्हणत आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक केलंय. 

मंत्रीपदापेक्षा कामं महत्त्वाची

दरम्यान, याशिवाय बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळच्या विस्तारावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ७ ते ८ महिन्यांसाठी मंत्रिपद घेण्यात काही अर्थ नाही. शिंदे-फडणवीस सरकारने भरभरून निधी दिला आहे. लोकांना पदापेक्षा कामं करणे महत्त्वाचं वाटते. आम्ही ते काम पूर्ण करतो, असे म्हणत एकप्रकारे बच्चू कडू यांनी आता मंत्रीपदाची अपेक्षाच सोडून दिल्याचं दिसून येतंय.  
 

Web Title: ... So Ayodhya was not on tour; Bachu Kadu spoke clearly about his displeasure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.