...तर शहरातील दुकानदार, व्यावसायिकांना माेठा आर्थिक भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:14 AM2021-07-15T04:14:45+5:302021-07-15T04:14:45+5:30
शहरात जीवनावश्यक वस्तू असाेत वा इतर सर्व आवश्यक साहित्याची विक्री करण्यासाठी दुकान थाटताना महापालिकेचा परवाना प्राप्त करणे भाग आहे. ...
शहरात जीवनावश्यक वस्तू असाेत वा इतर सर्व आवश्यक साहित्याची विक्री करण्यासाठी दुकान थाटताना महापालिकेचा परवाना प्राप्त करणे भाग आहे. याबदल्यात मनपाकडे परवाना शुल्क जमा करावे लागते. तसेच दरवर्षी मनपाकडे शुल्काचा भरणा करून परवान्याचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे; परंतु शहराच्या विविध भागात व्यवसाय थाटून त्या माध्यमातून आर्थिक उलाढाल करणाऱ्या अनेक व्यावसायिकांकडे महापालिकेचा परवानाच नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. तसेच अनेक व्यावसायिकांनी मागील अनेक वर्षांपासून परवान्याचे नूतनीकरण केले नसल्यामुळे प्रशासनाचे आर्थिक नुकसान हाेत आहे.
तपासणी माेहिमेला लवकरच सुरुवात
बाजार व परवाना विभागाच्या या प्रस्तावाला मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी हिरवी झेंडी दिल्याची माहिती आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत शहरातील सर्व दुकाने, प्रतिष्ठानच्या तपासणी माेहिमेला प्रारंभ केला जाणार आहे. परवान्याचे नूतनीकरण करणे ही नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे यादरम्यान काेणत्याही सबबी खपवून घेऊ नका, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिल्याची माहिती आहे.
मनपाच्या महसुलात हाेईल वाढ !
महापालिकेचा परवाना न घेताच काही व्यावसायिकांनी व्यवसाय थाटले आहेत. तपासणीदरम्यान ही बाब उजेडात आल्यास संबंधित व्यावसायिकाला माेठा आर्थिक दंड आकारला जाणार आहे. यामुळे मनपाच्या महसुलात वाढ हाेण्याची शक्यता आहे.