तर खाजगी रुग्णालयावर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:20 AM2021-03-10T04:20:09+5:302021-03-10T04:20:09+5:30
अकोला,- जिल्ह्यामध्ये कोविड संसर्गाचा प्रार्दुभाव सातत्याने वाढत असून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत खाजगी ...
अकोला,- जिल्ह्यामध्ये कोविड संसर्गाचा प्रार्दुभाव सातत्याने वाढत असून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत खाजगी रुग्णालयाव्दारे कोरोना रुग्णांना जास्त दर आकारण्यात येत असल्याचे तक्रार येत आहे. जास्त दर आकारणाऱ्या खाजगी रुग्णालयाच्या देयकाची तपासणी करुन जास्त दर आकारण्यात येत असल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यानी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात कोरोनाचा वाढता प्रार्दुभावबाबत वाररुममध्ये आढावा घेण्यात आला. यावेळी ते बाेलत हाेते
कोरोना संसर्ग झालेल्या तसेच कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तीचे शोध घेवून कोविड चाचण्या वाढविण्याचे सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिल्या. तसेच जिल्ह्यात लागू करण्यात आलेले संचारबंदीचे सक्तीने पालन करुन कुठेही गर्दी करु नये, प्रत्येक कोरोना रुग्णांनी आधार कार्ड किवा रेशन कार्ड सोबत आणणे अनिवार्य असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. होम आसोलेशनमधील रुग्णांना शिक्के मारणे, होमआसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णाकरीता स्वतंत्र्य व्यवस्था असल्याचे खातरजमा करावे, तसेच होमआयसोलेशन नियमाचे पालन न करण्याऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करावे, इत्यादी सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक राजकुमार चव्हाण, मनपाचे प्रभारी आयुक्त पंकज जावळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. नितीन आंभोरे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिक्षक डॉ. श्यामकुमार सिरसाम, मनपा वैद्यकीया अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा, आदि उपस्थित होते.