बसस्थानकात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:19 AM2021-04-08T04:19:32+5:302021-04-08T04:19:32+5:30

अकोला : शहरातील मध्यवर्तीय बसस्थानकात प्रवाशांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. स्थानकात प्रवासी घोळके करून उभे राहत आहे. बसलेले ...

Social distance fuss at the bus stand | बसस्थानकात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

बसस्थानकात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

Next

अकोला : शहरातील मध्यवर्तीय बसस्थानकात प्रवाशांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. स्थानकात प्रवासी घोळके करून उभे राहत आहे. बसलेले प्रवासीही सोशल डिस्टन्स पाळत नाही. त्यामुळे महामंडळ प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

--------------------------------------------

अर्धे शटर उघडून दुकानदारी

अकोला : शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे; मात्र काही भागांमध्ये अर्धे शटर उघडून दुकान सुरू आहेत. त्यामुळे काही दुकानदार बंदला जुमानत नसल्याचे दिसून येते.

----------------------------------------------

हळदीच्या उत्पादनात घट

अकोला : पारंपरिक पिकाला फाटा देत जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी हळद पिकाची लागवड केली; मात्र अतिपाऊस व कंदकुजमुळे हळदीच्या उत्पादनात घट झाली आहे. आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने दरही वाढले आहे.

-------------------------------------------------

जिल्हा बँकेकडून ९९ लाख रुपये कर्जवाटप

अकोला : यंदा रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात पीक कर्ज वाटप झाले आहे. यामध्ये जिल्हा सहकारी बँकेकडून ९९ लाख ८८ हजार रुपये कर्जवाटप झाले आहे. जिल्ह्यातील २८५ शेतकऱ्यांनी हे कर्ज घेतले आहे. पुढील हंगामात कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

---------------------------------------------------

उद्योग केवळ ५०-६० टक्के क्षमतेेने सुरू

अकोला : कोरोना काळात जिल्ह्यातील उद्योगांना मोठा फटका बसला आहे. वर्षभरानंतरही एमआयडीसीतील सर्व उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू झाले नाही. सद्य:स्थितीत सर्व उद्योग ५०-६० टक्के क्षमतेने सुरू आहेत. यामध्ये या लॉकडाऊनमुळे या उद्योगांना आणखी फटका बसण्याची शक्यता आहे.

Web Title: Social distance fuss at the bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.