सामाजिक दायित्व म्हणून प्रत्येकाने एक वृक्ष लावावा - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे आवाहन  

By atul.jaiswal | Published: July 1, 2018 01:40 PM2018-07-01T13:40:27+5:302018-07-01T13:45:31+5:30

वृक्षलागवडीच्या महत्वाकांक्षी संकल्पामध्ये मी सहभागी झालो आहे, आपणही वृक्षलागवड कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील नागरीकांना यांनी केले.

 As a social obligation, each one should plant a tree - Guardian Minister Dr. Appeal to Ranjit Patil | सामाजिक दायित्व म्हणून प्रत्येकाने एक वृक्ष लावावा - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे आवाहन  

सामाजिक दायित्व म्हणून प्रत्येकाने एक वृक्ष लावावा - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे आवाहन  

Next
ठळक मुद्दे१३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमातंर्गत रविवार, १ जुलै रोजी मोर्णा नदी काठी पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.अकोला जिल्हयासाठी तब्बल १९ लाख २२ हजार वृक्ष लागवडीच उदिष्ट देण्यात आले आहे. या मोहिमेत शासकीय यंत्रणेसह सामान्य नागरिक, विविध सामाजिक संस्था सहभागी झाल्या आहेत.

अकोला : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने सामाजिक दायित्व म्हणून एक वृक्ष लावुन त्याचे संगोपन करुन ते जगवणे अत्यंत गरजेचे आहे,असे सांगुन वृक्षलागवडीच्या महत्वाकांक्षी संकल्पामध्ये मी सहभागी झालो आहे, आपणही वृक्षलागवड कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील नागरीकांना यांनी केले. १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमातंर्गत रविवार, १ जुलै रोजी मोर्णा नदी काठी पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई वाघोडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, उपवनसंरक्षक एस.बी. वळवी, सामाजिक वनीकरण विभागीय वन अधिकारी विजय माने, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, आदींसह मोठया संख्येने विविध महाविदयालयांचे विदयार्थी आणि नागरिक यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वांनी यावेळी वृक्ष लागवड केली.
महाराष्ट्र शासनाद्वारे लोकसहभागातून १ जुलै ते ३१ जुलै २०१८ दरम्यान १३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. असा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. त्या संकल्पपुतीर्साठी ‘माझे एक झाड, मोर्णा काठी’ या उपक्रमातंर्गत सामाजिक वनीकरण विभाग तसेच वनविभागातर्फे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन रविवारी सकाळी मोर्णा नदी काठी करण्यात आले होते.
जनतेमध्ये जनजागृती करुन जनतेला वृक्षलागवडीबाबत प्रोत्साहीत करण्यासाठी पालकमंत्र्यांनी मोर्णा काठी वृक्षारोपण केले. त्यांच्या माध्यमातुन वृक्षलागवडीबाबत नागरीकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. अकोला जिल्हयासाठी तब्बल १९ लाख २२ हजार वृक्ष लागवडीच उदिष्ट देण्यात आले आहे. रविवारपासून वृक्ष लागवडीची मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेत शासकीय यंत्रणेसह सामान्य नागरिक, विविध सामाजिक संस्था सहभागी झाल्या आहेत.

जिल्ह्यात ४० रोपवाटिका

वन विभागातर्फे स्थापन करण्यात आलेल्या विविध रोपे विक्री केंद्रांवरुन नागरिकांनी रोपे घेऊन जाता येतील. अकोला येथे वनकुटी, अशोक वाटीकेसमोर, अकोट येथे वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) कार्यालय व तहसिल कार्यालय येथे रोप विक्री केंद्र आहे. तसेच जिल्हयात वन विभागाकडून १९ व सामाजिक वनीकरण विभागाकडून २१ रोपवाटिका तयार करण्यात आलेल्या आहेत. या रोप वाटिकेत २० लक्ष १० हजार रोपे आहेत, नागरीकांनी मोठया प्रमाणात रोपे घेवुन वृक्षारोपणाचे संकल्पात सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासना मार्फत करण्यात येत आहे.



या वृक्षांचा समोवश
खैर, पांगरा, अंजन, निम, काशिद, शिरस, करंज, विलायती चिंच, आवळा, चिंच, सिताफळ, शेवगा, जांभूळ, हादगा, वड, पिंपळ, बांबू, पिशवीतील साग रोपे, गुलमोहर, अमलतास, रेन ट्री, पेल्ट्रोफोरम, कांचन, बोगनवेल, क्रोटॉन, डयुरांटा, मोगरा, वड इत्यादी रोपे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामुळे जिल्हयात वृक्षलागवडी बाबत समाधानकारक वातावरण निर्माण झाले आहे.

 

Web Title:  As a social obligation, each one should plant a tree - Guardian Minister Dr. Appeal to Ranjit Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.