कार-कंटेनरच्या अपघातात समाजकल्याण अधिकारी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 01:33 PM2020-02-21T13:33:32+5:302020-02-21T13:33:46+5:30

समाजकल्याण अधिकारी अनंत मुसळे (५२) यांच्यासह अन्य एक जण जागीच ठार झाल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजतादरम्यान घडली.

Social welfare officer killed in car-container accident | कार-कंटेनरच्या अपघातात समाजकल्याण अधिकारी ठार

कार-कंटेनरच्या अपघातात समाजकल्याण अधिकारी ठार

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : एका न्यायालयीन प्रकरणाच्या सुनावणीसाठी कारने नागपूरला जात असताना, नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील खडका गावादरम्यान समोरून येणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने संंशोधन अधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव तथा वाशिम जिल्हा परिषदेचे प्रभारी समाजकल्याण अधिकारी अनंत मुसळे (५२) यांच्यासह अन्य एक जण जागीच ठार झाल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजतादरम्यान घडली.
एका न्यायालयीन प्रकरणाच्या सुनावणीसाठी प्रभारी समाजकल्याण अधिकारी अनंत मुसळे हे सुभाष दत्तात्रय गायकवाड (५५) यांच्यासोबत एमएच ३७ जी १६०१ क्रमांकाच्या कारने नागपूर येथे जात होते. अमरावती ते नागपूर या महामार्गादरम्यान काम सुरू आहे. या महामार्गावरील वर्धा नदीवरील पुलावर ‘एक्सपेंन्टेशन ज्वाईंट’चे काम पंधरा दिवसांपासून सुरू असल्याने अमरावतीकडे जाणाºया बाजुचा मार्ग बंद करुन भिष्णुर फाट्यापासून ते नवी भारवाडी दरम्यान (तळेगाव) दोन कि.मि. पर्यंतची वाहतुक एकाच बाजुने वळविण्यात आली. एकाच बाजूने दोन्ही मार्गाची वाहतूक सुरू आहे. या दरम्यान नागपूरकडून येणाºया एमएच १४ एफटी ८५९५ क्रमांकाच्या कंटेनरने मुसळे यांच्या कारला धडक दिली. या भिषण अपघातात अनंत मुसळे व सुभाश गायकवाड हे दोघेही जागीच ठार झाले. घटनास्थळावरून कंटेनरने पळ काढला.
(प्रतिनिधी)

Web Title: Social welfare officer killed in car-container accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.