महाबीजच्यासोयाबीन बियाण्यात मातीचे खडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 06:08 PM2020-06-14T18:08:12+5:302020-06-14T18:08:37+5:30

महाबीजने बियाण्याचा दर्जा योग्य राखला नसल्याने त्या शेतकऱ्यांनी संतापही व्यक्त केला आहे.

Soil stones in Mahabeej soybean seeds! | महाबीजच्यासोयाबीन बियाण्यात मातीचे खडे!

महाबीजच्यासोयाबीन बियाण्यात मातीचे खडे!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ऐन खरीप हंगाम पेरणीच्या धामधुमीत शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या सोयाबीन बियाण्यात मातीचे खडे निघत असून, बॅगचे वजनही ४०० ग्रॅमपर्यंत कमी भरत असल्याचा प्रकार अकोला तालुक्यातील कौलखेड जहागीर येथील शेतकरी ज्ञानेश्वर कडू, सुनीता गावंडे यांच्याकडे उघड झाला आहे. याप्रकरणी महाबीजने बियाण्याचा दर्जा योग्य राखला नसल्याने त्या शेतकऱ्यांनी संतापही व्यक्त केला आहे.
कौलखेड जहागीर येथील शेतकरी ज्ञानेश्वर कडू, सुनीता गावंडे यांनी पाऊस पडल्यानंतर बियाण्याला औषध लावण्याचे काम सुरू केले. महाबीज कंपनीच्या बॅगमधून काढलेल्या सोयाबीनमध्ये मोठ्या आकाराचे मातीचे खडे, काळ्या रंगाचे काही दाणे दिसून आले. त्यामुळे बियाणे पॅक करण्यापूर्वी त्याची स्वच्छता व प्रतवारी केली नाही का, असा प्रश्न या दोन्ही शेतकºयांना पडला. बियाण्याला झेलोरा औषध लावण्यासाठी आलेले मजूर संदीप झोंबाळे, मंगेश तायडे यांच्याकडून मातीचे खडे वेचून घेतले. त्यावेळी एका बॅगमध्ये १५० ते २०० ग्रॅम वजनाचे खडे निघाले. तसेच बॅगची मोजणी केली असता ३०० ते ४०० ग्रॅम वजन कमी भरले. त्यात बारदान्याचे वजन ४०० ग्रॅम, थायरम पावडर- १५० ग्रॅम तसेच २०० ग्रॅम मातीचे खडे मिळून एकूण १ किलो १५० ग्रॅम बियाण्याचे शेतकºयांचे नुकसान आहे.
एका बॅगमध्ये एवढे वजन कमी होत असल्याने शेतकºयांनी बियाण्यांच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यातच बियाण्याची स्वच्छता, प्रतवारी झाली नसेल तर ते बियाणे उगवते की नाही, ही धास्तीही शेतकºयांमध्ये निर्माण झाली आहे. या बाबीची दखल घेऊन महाबीजने सुधारणा करावी, अशी मागणीही त्या शेतकºयांनी केली आहे.


यापूर्वी महाबीजच्या सोयाबीन बियाणे एका गोणीत ३०० ते ४०० ग्रॅम कमी निघाले. आता त्यामध्ये माती खडे निघत आहेत. एका बॅगमध्ये जवळपास १०० ग्रॅम हे खडे आहेत. याकडे महाबीजने लक्ष देण्याची गरज आहे.
- मनोज तायडे, संयोजक, शेतकरी जागर मंच, अकोला.


बियाणे बीजोत्पादक शेतकरी स्वत: गे्रडिंग करून आणतात. आम्ही पुन्हा तीन वेळा शेतकºयांनी आणलेल्या बियाण्यांचे गे्रडिंग करतो. हे सर्व गे्रडिंग यंत्राने केल्या जाते. त्यामुळे बियाण्यात खडे निघतच नाही. शंका असल्यास शेतकºयांनी ही गे्रडिंग पद्धत बघावी
- अजय कुचे,
महाव्यवस्थापक (विपणन), महाबीज, अकोला.

Web Title: Soil stones in Mahabeej soybean seeds!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.