सोलर लाइट इन्सेक्ट ट्रॅप तंत्रज्ञान; पंदेकृविचा खासगी कंपनीसोबत करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:44 PM2018-11-20T12:44:54+5:302018-11-20T12:45:14+5:30
अकोला: बोंडअळी व इतर कि डींवर नियंत्रण मिळविणाऱ्यांसाठी राष्टÑीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सोलर लाइट इन्सेक्ट ट्रॅप तंत्रज्ञान विकसित केले असून, या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी या कृषी विद्यापीठाने एका खासगी कंपनीसोबत शनिवारी करार केला
अकोला: बोंडअळी व इतर कि डींवर नियंत्रण मिळविणाऱ्यांसाठी राष्टÑीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सोलर लाइट इन्सेक्ट ट्रॅप तंत्रज्ञान विकसित केले असून, या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी या कृषी विद्यापीठाने एका खासगी कंपनीसोबत शनिवारी सामंज्यस करार केला.
सोलर लाइट इन्सेक्ट तंत्रज्ञान वापरल्याने शेतकºयांना फायदा होेणार असून, खर्चाची बचत होईल, तसेच कीटकनाशकाद्वारे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम कमी करता येतील. या दृष्टीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अपारंपरिक ऊर्जास्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभागाने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास हानिकारक कीटकनाशकांची पुढची पिढी नष्ट करण्यात मोठी मदत होणार आहे. म्हणूनच हे तंत्रज्ञान शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यासाठी सामंज्यस करार करण्यात आल्याची माहिती डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. व्ही.एम. भाले यांनी या करारदरम्यान झालेल्या कार्यक्रमात दिली. यावर पुढे संशोधन सुरू ठेवण्याचे निर्देश शास्त्रज्ञांना दिले. अपारंपारिक ऊर्जास्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी हे तंत्रज्ञान शेतकºयांसाठी उपयोगी असल्याने मागणी वाढत असल्याचे सांगितले. याप्रसंगी कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, कुलसचिव डॉ. पी.आर. कडू, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुभाष टाले यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांची उपस्थिती होती.