लग्नाचे आमिष दाखवून सैनिकाचा युवतीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 12:33 IST2019-12-18T12:33:49+5:302019-12-18T12:33:53+5:30
ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर नरेश वानखडे याने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला.

लग्नाचे आमिष दाखवून सैनिकाचा युवतीवर अत्याचार
बाळापूर : पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोरेगाव खुर्द येथील सैन्यात असलेल्या २७ वर्षीय जवानाने गावातीलच २३ वर्षीय युवतीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी युवतीच्या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी आरोपी जवानाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गोरेगाव खुर्द येथील सैन्य दलात असणाऱ्या नरेश अरुण वानखडे याची दोन वर्षांपूर्वी गावातीलच २३ वर्षीय युवतीबरोबर बसमध्ये ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर नरेश वानखडे याने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. त्यानंतर आता लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवतीने बाळापूर पोलिसात फिर्याद दिली. बाळापूर पोलिसांनी याप्रकरणी नरेश वानखडेविरुद्ध भादंवि कलम ३७६ नुसार तर त्याचा भाऊ संदेश वानखडे विरुद्ध ५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी)