सामाजिक उपक्रम राबवून जवानाने केले महामानवाला अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:17 AM2021-04-16T04:17:57+5:302021-04-16T04:17:57+5:30
व्यवस्थेने रंजल्या गांजलेल्या हजारो पिढ्याच्या जीवनातील हजारो वर्षाचा अंधकार आपल्या ज्ञानाने दूर करून मानव जातीचे जीवन प्रकाशमान करणाऱ्या ज्ञानसूर्य ...
व्यवस्थेने रंजल्या गांजलेल्या हजारो पिढ्याच्या जीवनातील हजारो वर्षाचा अंधकार आपल्या ज्ञानाने दूर करून मानव जातीचे जीवन प्रकाशमान करणाऱ्या ज्ञानसूर्य डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्ताने भारतीय सैन्य दलातून काही दिवसांसाठी रजेवर आलेले संघानद देवानंद वानखडे यांनी सर्व प्रथम बुद्ध विहार वणी येथे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्रिशरण पंचशील घेतले़ विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी नेहमी अग्रेसर असलेले वानखडे कुटुंब यांनी यावेळी कोरोनासारख्या महामारी संकट व लॉकडाऊनमुळे दिव्यांग, गरीब कुटुंबाचा उदरनिर्वाह प्रश्न लक्षात घेता वणी रंभापूर येथील अनुसूचित जातीमधील दिव्यांग, गरीब कुटुंबाला एक महिना पुरेल असे किराणा साहित्याचे वितरण त्यांच्या राहत्या घरी जाऊन केले असता गरजू असलेल्या त्या कुटुंबाने आभार व्यक्त केले़