सुटीवर आल्यावर सैनिक करायचा चेनस्नॅचिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 12:19 PM2018-12-02T12:19:06+5:302018-12-02T12:19:15+5:30

अकोला: सैन्यात असलेला सैनिक गावी सुटीवर आला, की सहकाऱ्यासोबत फिरून महिलांच्या गळ्यांच्या सोनसाखळ्या, मंगळसूत्र हिसकावून पसार व्हायचा. हा गुन्हा त्याने एकदा नव्हे, तर अनेकदा केला आहे.

soldire arested for Chain snatching on the holidays | सुटीवर आल्यावर सैनिक करायचा चेनस्नॅचिंग!

सुटीवर आल्यावर सैनिक करायचा चेनस्नॅचिंग!

googlenewsNext

अकोला: सैन्यात असलेला सैनिक गावी सुटीवर आला, की सहकाऱ्यासोबत फिरून महिलांच्या गळ्यांच्या सोनसाखळ्या, मंगळसूत्र हिसकावून पसार व्हायचा. हा गुन्हा त्याने एकदा नव्हे, तर अनेकदा केला आहे. या सैनिकाला सहकाºयासोबत अटक केल्यावर या बाबीचा खुलासा झाला आहे. चेनस्नॅचिंग प्रकरणात अटक केलेल्या सैनिकासह सहकाºयाला ३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
बाळापूर तालुक्यातील कोळासा येथील राहणारा मंगेश गजानन इंदोरे हा गत काही वर्षांपासून सैन्यदलात कार्यरत आहे. तो सुटीवर गावी आला, की गावातील त्याचा सहकारी मित्र मिलिंद गजानन डाबेराव याच्या मदतीने शहरांमध्ये चेनस्नॅचिंगचे गुन्हे करायचा आणि पळून जायचा. रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याने एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लुटले होते. त्यानंतर त्याने शेगाव येथेसुद्धा असे तीन गुन्हे केले होते. शेगाव पोलीस ठाण्यात त्याच्यावर ३0२ गुन्हा दाखल करण्याऐवजी पोलिसांनी ३७९ नुसार गुन्हा दाखल केला होता, हे विशेष. खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चेनस्नॅचिंग गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत असताना, त्यांना मंगेश इंदोरे आणि मिलिंद डाबेराव यांची माहिती मिळाली. त्यांना गुरुवारी रात्री कोळासा गावातून ताब्यात घेतल्यावर स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात आणले. या ठिकाणी त्यांची चौकशी केल्यावर दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघा आरोपींना न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे त्यांनी कुठे आणि किती गुन्हे केले आहेत, याचा खुलासा होण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक कैलास नागरे, पीएसआय रणजितसिंह ठाकूर, अजय नागरे, दत्तात्रय ढोरे, शक्ती कांबळे, मनोज नागमते, गीता अवचार व गौरव भंवर यांनी केली. (प्रतिनिधी)

आरोपींची ओळखपरेड व्हावी!
चेनस्नॅचिंगचे गुन्हे करणारे आरोपी एक किंवा दोन नाही, तर त्यांची टोळी आहे. आरोपींनी यापूर्वी सिव्हिल लाइन, खदान, मूर्तिजापूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया भागातसुद्धा चेनस्नॅचिंगचे गुन्हे केले आहेत. त्यामुळे तक्रारकर्त्यां महिलांसमोर आरोपींची ओळखपरेड होणे गरजेचे आहे. ओळखपरेड झाल्यास आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

 

Web Title: soldire arested for Chain snatching on the holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.