घनकचऱ्याचा ‘डीपीआर’ सदाेष; ‘मार्स’ एजन्सीवर ठपका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:50 AM2021-02-20T04:50:50+5:302021-02-20T04:50:50+5:30
काँग्रेसची चाैफेर टीका प्रकल्प अहवालात भाेड येथील जागेत असलेल्या खड्ड्याचा उल्लेख का नाही, असा सवाल विराेधी पक्षनेता साजीद खान ...
काँग्रेसची चाैफेर टीका
प्रकल्प अहवालात भाेड येथील जागेत असलेल्या खड्ड्याचा उल्लेख का नाही, असा सवाल विराेधी पक्षनेता साजीद खान यांनी उपस्थित केला. कहर म्हणजे प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या निविदेतही खड्ड्याचा उल्लेख नसल्याने प्रशासनाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर काँग्रेसचे माेहम्मद इरफान यांनी प्रशासनासह सत्तापक्ष भाजपच्या भूमिकेवर चाैफेर टीका केली.
४५ काेटींचा प्रकल्प; टिप्पणी का नाही?
शहराचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असताना ‘डीपीआर’मध्ये खड्ड्याचा उल्लेख नाही. आता सात काेटींच्या अतिरिक्त शुल्काचा भार मनपाने का स्वीकारावा, असे नमूद करीत आयुक्त निमा अराेरा यांच्या भूमिकेचे काँग्रेस नगरसेवक डाॅ. जिशान हुसेन यांनी स्वागत केले. ४५ काेटींच्या प्रकल्पाविषयी नगरसेवकांना टिप्पणी का नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.