गावठाणमधील पात्र घरकुलधारकांचा प्रश्न मार्गी लावा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:15 AM2021-07-15T04:15:03+5:302021-07-15T04:15:03+5:30
वाडी अदमपूर: तेल्हारा तालुक्यातील अनेक गावात गावठाणमधील घरकुलास पात्र असलेल्या अतिक्रमणधारकांचा प्रश्न गत काही वर्षांपासून प्रलंबित असल्याने शेकडोजण घरकुलाच्या ...
वाडी अदमपूर: तेल्हारा तालुक्यातील अनेक गावात गावठाणमधील घरकुलास पात्र असलेल्या अतिक्रमणधारकांचा प्रश्न गत काही वर्षांपासून प्रलंबित असल्याने शेकडोजण घरकुलाच्या लाभापासून वंचित आहेत.याकडे लक्ष देऊन गावठाणातील पात्र घरकुलधारकांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी वाडी अदमपूर येथील सरपंच मीराताई बोदडे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, तालुक्यामध्ये गावठाणातील एकूण १२८ प्रकरणामध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांचा आदेश प्राप्त झाला आहे. परंतु अद्यापही घरकुलधारक लाभापासून वंचित आहेत. इसापूर येथील वृद्ध विधवा महिलेला लाभ मिळाला नाही. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष देऊन घरकुलधारकांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदनावर सरपंच मीराताई आनंद बोदडे, उपसरपंच महादेवराव नागे, बाभुळगावचे सरपंच श्रीकृष्ण वैतकार, प्रदीप तेलगोटे, ग्रा.पं सदस्य कमलाबाई घोडस्कार, जयश्रीताई खंडुजी घाटोळ, पंजाबराव तायडे, नितीन पाखरे, पंजाबराव दुसेकर, रतन दांडगे, प्रकाश बोदडे, खंडुजी घाटोळ, शुद्धोधन गवई, दीपक दारोकार, सुरेंद्र भोजने, आनंद बोदडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
-------------