करदात्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आता ‘जीएसटी’चे राज्यभरात मदत कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 02:35 PM2018-10-26T14:35:57+5:302018-10-26T14:36:13+5:30
अकोला : करदात्यांच्या समस्या लक्षात घेत (वस्तू आणि सेवाकर) ‘जीएसटी’ कार्यालयाने राज्यभरात मदत कक्ष उघडण्याचा निर्णय घेतला आहे.
- संजय खांडेकर
अकोला : करदात्यांच्या समस्या लक्षात घेत (वस्तू आणि सेवाकर) ‘जीएसटी’ कार्यालयाने राज्यभरात मदत कक्ष उघडण्याचा निर्णय घेतला आहे. या कक्षाच्या माध्यमातून जीएसटी अधिकारी आता नवीन अर्जकर्ते, बदलकर्ते आणि अर्ज रद्द करणाºयांच्या समस्या सोडविणार आहेत. राज्यभरात मदत कक्ष उघडण्याचे निर्देश जीएसटीचे राज्य कर आयुक्त राजीव जलोटा यांनी दिले असून, विविध विभागातील त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
जीएसटीच्या आॅनलाइन यंत्रणेत अजूनही अनेक तांत्रिक चुका असून, त्या सोडविल्या नाहीत. या समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी जीएसटीचे राज्य कर आयुक्त राजीव जलोटा यांनी २४ आॅक्टोबर रोजी एक परिपत्रक काढून प्रत्येक विभागाने आणि संबंधित जीएसटी कार्यालयाने मदत कक्ष उघडून करदात्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, कोल्हापूर, नांदेड, ठाणे, पुणे, रायगड, सोलापूर, धुळे या जीएसटी कार्यालयांच्या विभागात आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी दुसºयाच दिवसापासून सुरू झाली आहे.
स्थलांतराचे विषय अजूनही मोठ्या प्रमाणात रेंगाळत पडल्याने काही व्यापारी-उद्योजकांना विनाकारण कर भरावा लागत आहे. अनेकांनी जीएसटीची नोंद केली; मात्र आता व्यापार नसल्याने विनाकारण कर भरण्याची वेळ आली. काहींना स्लबमध्ये बदल करायचा आहे, तर काहींना जीएसटी क्रमांक रद्द करावयाचा आहे. जीएसटी रिटर्न थ्री बी, जीएसटीआर वन, फोर, फाइव्ह, सिक्स, सेव्हनच्या अडचणी आणि रिफंडबाबत येणाºया प्रत्येक अडचणीवर मदत कक्षातून मार्गदर्शन मिळणार आहे. केवळ करदात्याला प्रत्यक्ष या मदत कक्षात यावे लागेल किंवा संबंधितांचा पासवर्ड आणि संमती आवश्यक आहे.
अकोल्यात कार्यरत मदत कक्षाचा करदात्यांनी आणि कर सल्लागारांनी लाभ घेऊन सुधारणा करून घ्यावी. मार्गदर्शन आणि बदलच्या दोन्ही सेवा देण्यासाठी मदत कक्ष उपयुक्त ठरेल.
-अनिल करडेकर,
राज्य कर उपायुक्त, जीएसटी कार्यालय अकोला.