जनसामान्यांच्या अडचणी सोडवा, संघटित व्हा, एकत्र या; दिलीप वळसे पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

By आशीष गावंडे | Published: October 4, 2023 10:13 PM2023-10-04T22:13:59+5:302023-10-04T22:14:17+5:30

शेतीसाठी व वैयक्तिक कर्ज सुविधा देण्यासाठी सहकार कायद्यात सुधारणा करणार असल्याचे सहकार मंत्री वळसे पाटील यांनी सांगितले.

solve the problems of the masses organize come together appeal dilip walse patil in akola | जनसामान्यांच्या अडचणी सोडवा, संघटित व्हा, एकत्र या; दिलीप वळसे पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

जनसामान्यांच्या अडचणी सोडवा, संघटित व्हा, एकत्र या; दिलीप वळसे पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

googlenewsNext

आशिष गावंडे, अकोला: जनसामान्यांच्या समस्या व अडचणी समजून घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचा. त्यासाठी संघटित हाेऊन एकत्र येण्याचे आवाहन सहकार मंत्री तथा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. 

राज्याचे सहकार मंत्री तथा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (अजित पवार गट) नेते दिलीप वळसे पाटील अकोला शहरात बुधवारी सायंकाळी दाखल झाले असता त्यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, महानगराध्यक्ष विजय देशमुख यांनी आयाेजित केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा तसेच आढावा बैठकीला मार्गदर्शन केले. अवघ्या पाच ते सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे निर्देश वळसे पाटील यांनी दिले. पक्ष संघटन मजबूत करून प्रत्येक प्रभागासाठी कार्यकर्त्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची सूचनाही त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केली. आपण सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत प्रामाणिक आहोत. त्यामुळे भूतकाळात न जाता अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षाला बळ देण्याचे काम करावे, असे सहकार मंत्री वळसे पाटील म्हणाले. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज चव्हाण, माजी मंत्री तथा आमदार राजेंद्र शिंगणे, विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी विचार व्यक्त केले. व्यासपीठावर माजी आमदार तुकाराम बिडकर, वाशिम जिल्हाअध्यक्ष युसुफ पुंजवाणी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, महानगराध्यक्ष विजयराव देशमुख, निखील ठाकरे, रायुकाॅंचे शहर अध्यक्ष अजय मते आदी उपस्थित होते. 

सहकार कायद्यात सुधारणा करणार

शेतीसाठी व वैयक्तिक कर्ज सुविधा देण्यासाठी सहकार कायद्यात सुधारणा करणार असल्याचे सहकार मंत्री वळसे पाटील यांनी सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समित्या, सेवा सहकारी साेसायट्यांचे कामकाज पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरु राहील, त्यामध्ये काेणताही नवीन बदल केला जाणार नसल्याचे सांगत वळसे पाटील यांनी आश्वस्त केले. दरम्यान, काही दिवसांपासून समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचे काम होत आहे. अशावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी वादग्रस्त प्रकरणांमध्ये लक्ष न देता एकाेप्याने राहण्याची गरज असल्याचे सहकार मंत्री वळसे पाटील यांनी नमुद केले.

Web Title: solve the problems of the masses organize come together appeal dilip walse patil in akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.