कुणी घर देता कार घर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:23 AM2021-02-17T04:23:28+5:302021-02-17T04:23:28+5:30
तालुक्यात तांदळी, जांभरून गावात पारधी समाजाची संख्या मोठी आहे. मात्र, स्वातंत्र्याची ६८ वर्षे उलटून गेल्यानंतर समाजातील अनेकांना घर बांधायला ...
तालुक्यात तांदळी, जांभरून गावात पारधी समाजाची संख्या मोठी आहे. मात्र, स्वातंत्र्याची ६८ वर्षे उलटून गेल्यानंतर समाजातील अनेकांना घर बांधायला जागा मिळाली नाही आणि जागा नसल्यामुळे शासनाने मंजूर केलेले घरकुलही मिळत नाही. त्यामुळे पारधी समाजावर ‘कुणी घर देता का घर’, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. तांदळी येथील येथील मॅट्रिक भोसले यांना गेल्या सहा वर्षांपूर्वी इंदिरा आवास योजनेतर्गंत घर मंजूर करण्यात आले होते. घराचे अनुदान म्हणून १९ हजार रुपयांचा पहिला हप्तसुद्धा मिळाला. त्यानंतर गेल्या सहा वर्षांपासून पातूर पंचायत समितीचे उंबरठे झिजवत असलेल्या मॅट्रिक भोसले यांना उर्वरित रक्कम मिळाली नाही. त्यामुळे त्यांचे घराचे बांधकाम रखडले आहे. परिणामी त्यांना उघड्यावर आपला संसार थाटला आहे. सोमवारी त्यांनी शासनाकडे घर देता का घर... अशी मागणी केली.
फोटो:
तालुक्यातील १६८ लाभार्थींना अनुदान नाही!
पातूर तालुक्यातील १६८ गरीब लाभार्थींना एक हप्ता अनुदानवगळता उर्वरित रक्कम मिळालेली नाही. पंचायत समिती स्तरावर विचारणा केल्यावर, शासनाकडून अनुदान आले नाही. अनुदान आल्यावर रक्कम आल्यावर तुमच्या खात्यात जमा केली जाईल, असे सांगितले जाते. सहा वर्षांपासून घरकुलांचे अनुदान शासनाकडूनच नसावे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.