कोणी सेफ्टी पिन गिळताे, कोणाच्या नाकात शेंगदाणा, तर कोणाच्या नाकामध्ये गहू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:23 AM2021-09-09T04:23:56+5:302021-09-09T04:23:56+5:30

मुले काय करतील याचा नेम नाही. सुटे पैसे तोंडात टाकून ठेवत असल्याने अनेकदा ते पोटात जातात. सेप्टी पीन किंवा ...

Someone swallows a safety pin, a peanut in someone's nose, and wheat in someone's nose! | कोणी सेफ्टी पिन गिळताे, कोणाच्या नाकात शेंगदाणा, तर कोणाच्या नाकामध्ये गहू!

कोणी सेफ्टी पिन गिळताे, कोणाच्या नाकात शेंगदाणा, तर कोणाच्या नाकामध्ये गहू!

Next

मुले काय करतील याचा नेम नाही.

सुटे पैसे तोंडात टाकून ठेवत असल्याने अनेकदा ते पोटात जातात.

सेप्टी पीन किंवा इतर साहित्य ताेंडात टाकतात. त्यामुळे अडचण होते. खेळता खेळता गहू, हरभऱ्याची डाळ या वस्तू नाकात टाकत असल्याने त्या श्वसननलिकेत अडकतात.

घरातील लोकांनी आपल्या आजारासाठी आणलेली औषधे खिडकी किंवा कपाटात ठेवली असतील, तर ती औषधे लहान मुले सेवन करतात.

अशी घ्या मुलांची काळजी

लहान मुले खेळत असतील, तर आपली नजर चुकवून ते साहित्य तोंडात किंवा नाकात टाकत असतात. त्यासाठी त्यांच्याकडे लक्ष द्या.

उंदीर मारण्याचे औषध, आजारासाठी वापरण्यात येणारे औषध बाहेर ठेवू नका.

वेळोवेळी खेळत असलेल्या मुलांनी काही खाल्ले तर नाही याची शहानिशा करा, घातक वस्तू त्यांच्या हातात लागणार नाहीत याची खबरदारी घ्या.

खाऊचे शिक्के पाेटात टाकतात.

कुणाच्या घरी पाहुणे आले की, ते पाहुणे परत जाताना लहान मुलांना खाऊचे पैसे देतात. ते पैसे लहान मुले घरातील मंडळींकडे देत नाहीत. ते पैसे आपल्याकडे घेण्याचा माणस घरातील मोठी मंडळीही करीत नाही. शिक्के असलेले पैसे काही काळ आपल्याजवळ बाळगताना लहान मुले कधी खिशात, तर कधी हातात ठेवतात. ते शिक्के अनेक लहान मुले तोंडात टाकतात. त्यामुळे तोंडात ठेवलेला शिक्का पोटात जाण्याची शक्यता असते. बहुधा पोटात गेलेला शिक्का काढण्यासाठी बालकांना केळ खायला देतात.

Web Title: Someone swallows a safety pin, a peanut in someone's nose, and wheat in someone's nose!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.