कोरोना रुग्ण आढळले; सोनाळा गाव प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 06:03 PM2021-05-22T18:03:37+5:302021-05-22T18:04:01+5:30
Akola Rural News : गावाच्या चार ही बाजूच्या सिमा सिल करण्याचे तहसीलदार बाळापुर यांनी तलाठी सचिन काकडे यांना आदेश दिले आहेत.
बोरगाव वैराळे : बाळापुर तालुक्यात येत असलेल्या सोनाळा पूर्णा गावात कोरोना १९ चे तेरा रूग्ण आढळून आल्यामुळे या गावाच्या चार ही बाजूच्या सिमा सिल करण्याचे तहसीलदार बाळापुर यांनी तलाठी सचिन काकडे यांना आदेश दिले आहेत. हा आदेश कोरोना संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळेपर्यत कायम राहणार असल्याची तलाठी सचिन काकडे यांनी दिली आहे
शहरानंतर ग्रामीण भागात कोरोना रूग्णाची झपाट्याने वाढ होत असल्यामुळे ग्रामीण भागात रूग्ण संख्या देखील झपाटयाने वाढत आहे. तीन दिवसापूर्वी सोनाळा पूर्णा येथील कोरोना बाधित रुग्णाचा अकोल्यात उपचारादरम्यान मुत्यु झाल्यामुळे सोनाळा येथील ग्रामस्थाची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये आतापर्यंत तेरा रूग्ण आढळून आल्यामुळे सोनाळा गावच्या चार ही सिमा तातडीनं सिल करण्याचे आदेश बाळापुर चे तहसीलदार डी एल मुकुंदे यांनी अंदुरा भाग दोन चे तलाठी सचिन काकडे यांना दिले आहेत. तलाठी सचिन काकडे, कोतवाल राजू डाबेराव हे सोनाळा गावात दाखल झाले आणि त्यांनी सरपंच, पोलिस पाटील यांच्या मदतीने सोनाळा पूर्णा गाव सिल केले.