विदेशातील शेतक-यांनी जाणल्या शेतक-यांच्या व्यथा

By admin | Published: December 6, 2014 12:49 AM2014-12-06T00:49:30+5:302014-12-06T01:05:35+5:30

विदेशी कृषितज्ज्ञांनी व्यक्त केली सहयोग व संवेदनेची गरज.

Soreness of Farmers Known by Foreign Farmers | विदेशातील शेतक-यांनी जाणल्या शेतक-यांच्या व्यथा

विदेशातील शेतक-यांनी जाणल्या शेतक-यांच्या व्यथा

Next

अकोला: शेतकर्‍यांच्या आत्महत्येची धग राजकीय नेतेमंडळीपर्यंत न पोहचल्याचे वास्तव असताना परदेशातून भारतीय कृषीचे अध्ययन करण्यास आलेल्या कृषीतज्ज्ञ व शेतकर्‍यांचे काळीज मात्र हेलावल्याचे दृष्य शुक्रवारी तालुक्यातील सुकळी येथे पाहावयास मिळाले.
डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ व फार्र्मस डायलॉग व सर रतन टाटा ट्रस्ट या संस्थाच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय शेतकरी परिसंवादाच्या दुसर्‍या दिवशी परिसंवदात सहभागी शेतकरी व शेती तज्ज्ञांनी तालुक्यातील सुकळी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची भेट घेतली. आत्महत्या केलेल्या कै. तुळशीराम हरिभाऊ लांडे, कै. बलदेव आत्माराम वानखडे, कै. पुंडलिक वैराळे आणि कै. केशव तुकाराम के ने यांच्या कु टुंबातील सदस्यांनी यावेळी त्यांची आपबिती सांगीतली. विदेशी पाहुण्यांनी शेतकर्‍यांच्या वेदना जाणुन घेण्याचा प्रयत्न केला. प्रगत राष्ट्रामधील शेतकरीसुद्धा नानाविध समस्येने ग्रस्त असुन आत्महत्येचे लोण सर्वत्र पसरल्याचे त्यांनी सांगीतले. क ठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांनी शेतकर्‍यांना यावेळी मार्गदर्शन केले. क ठीण परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी सहयोग आणि संवेदनेची गरज असल्याचे मोनिका हावर्ट या शेतकरी महीलेने व्यक्त केली.
फार्र्मस डॉयलाग संस्थेचे ऑस्ट्रेलिया येथील अध्यक्ष फिल जेफ्रिज, जिम वेगन, मोनिका व कॉलिन हावर्ट, लेविस वॉलिस, कॅनडा येथील शर्मिला गुंजाळ, केनिया येथील जॉर्ज कीरू यांच्यासह अभय शाह, कमलकिशोर धिरण कृषी विद्यापीठाचे डॉ. नारायण काळे यांच्यासह अन्य शेतक री या वेळी उपस्थित होते.

Web Title: Soreness of Farmers Known by Foreign Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.