अकोला जिल्ह्यात दोन टक्के क्षेत्रावर पेरणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 06:32 PM2019-06-28T18:32:41+5:302019-06-28T18:32:52+5:30
अकोला : एक आठवड्यानंतर २६ जून रोजी जिल्ह्यातील काही भागात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली.
अकोला : एक आठवड्यानंतर २६ जून रोजी जिल्ह्यातील काही भागात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. जिल्ह्यात आतापर्यंत दोन टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून, पहिल्या टप्प्यात शेतकºयांनी कापूस पेरणीला प्राधान्य दिले. शेतकºयांना आता सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यात खरिपाचे ४ लाख ८० हजार ५८६ हेक्टर क्षेत्र पेरणीलायक असून, कृषी विभागाने यावर्षी ४ लाख ८० हजार हेक्टर पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यावर्षी १ लाख ६५ हजार हेक्टर कापूस व तेवढेच सोयाबीन पेरणीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ७ हजार ६५० हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. यामध्ये ७ हजार २४२ हेक्टर कापूस असून, २४२ हेक्टरवर सोयाबीन पेरणी करण्यात आली आहे. बार्शीटाकळी व मूर्तिजापूर तालुका वगळता अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर व अकोला तालुक्यात कपाशीची पेरणी करण्यात आली. पातूर तालुक्यातही शेतकºयांनी सोयाबीनची पेरणी केली. १ लाख ६५ हजार हेक्टर उद्दिष्टापैकी आतापर्यंत २४२ हेक्टरवर शेतकºयांनी सोयाबीनची पेरणी केली. कृषी विभागाने जिल्ह्याला यावर्षी बियाण्याची पूरक तजवीज केली. यामध्ये कपाशी बियाण्यांची ७ लाख २० हजार पाकिटांची नोंदणी करण्यात आली होती. बाजारात त्यापैकी ५ लाख ३ हजार ६४२ संकरित पाकिटे उपलब्ध झालेली आहेत. शेतकºयांनी ही संकरित पाकिटे खरेदीला सुरुवात केली. सोयाबीनचे उद्दिष्ट यावर्षी कापसाएवढेच म्हणजे १ लाख ६५ हजार आहे. या क्षेत्राची गरज बघून जिल्ह्याला ७० हजार क्ंिवटल बियाणे उपलब्ध झाले आहेत. प्रत्यक्षात मागणी ही ५० हजार ५०० क्ंिवटलची होती. त्यामुळे यावर्षी तरी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवणार नसल्याचे कृषी विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. यावर्षी तुरीचे १५ हजार ५० क्ंिवटल बियाणे बाजारात उपलब्ध आहेत. मुगाचे १३ हजार क्ंिवटल बियाणे उपलब्ध असून, उडिदाचे १० हजार ९५ क्ंिवटल बियाणे उपलब्ध आहेत. यावर्षी ज्वारीचे ६०४ क्ंिवटल बियाणे उपलब्ध आहेत. पावसाचे चित्र बघता ज्वारीसह पेरणी फायदेशीर ठरू शकते. खारपाणपट्ट्यातील शेतकºयांनी नियोजन केले. तथापि, प्रत्यक्षात पेरणी किती होते, यावर अवलंबून आहे.
- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रक्षेत्र मोठे असल्याने यावर्षी कृषी विद्यापीठाच्या मुख्य बीजोत्पादन व मध्यवर्ती संशोधन केंद्रांतर्गत पावसाच्या अगोदरच काही क्षेत्रावर पेरणी करण्यात आली. बुधवारी पाऊस आल्याने गुडधी, पश्चिम विभाग क्षेत्रावर पेरणी करण्यात येत आहे.