अकोल्यात ५० एकरावर रंगीत कापूस बियाणे पेरणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:47 PM2019-07-27T12:47:52+5:302019-07-27T12:51:00+5:30
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यावर्षी ५० एकरावर रंगीत कापूस बियाणे पेरणी केली.
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यावर्षी ५० एकरावर रंगीत कापूस बियाणे पेरणी केली. यापासून १५० क्ंिवटल कापूस केंद्रीय कापूस तंत्रज्ञान (सीरकॉट) संस्थेला उपलब्ध करू न दिला जाणार आहे. रंगीत कापसाचे राज्यात पहिले संशोधन याच कृषी विद्यापीठाने केले असून, कृषी विद्यापीठाकडे याचा जनुकीय संग्रह आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कापूस संशोधक डॉ. एल. डी. मेश्राम यांनी जंगली कापूस जातीवर संशोधन करू न खाक ी, तपकिरी रंगाची कापूस निर्मिती केली होती. त्यानंतर हे संशोधन मागे पडले असले तरी कृषी विद्यापीठाने जनुक ीय संग्रह केला आहे. नागपूरच्या केंद्रीय कापूस (सीआयसीआर) संशोधन केंद्रानेदेखील रंगीत कापसाची जात विक सित केलेली आहे. आता नैसर्गिक रंगीत कापड उपलब्ध करू न देण्याचा निर्णय डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने घेतल्याने पुन्हा या कापसाची पेरणी केली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे उपलब्ध असलेले रंगीत बियाणे यावर्षी कृषी विद्यापीठाच्या वणी रंभापूर येथील मुख्य बीजोत्पादन प्रक्षेत्रावरील ५० एकरावर पेरणी करण्यात आली आहे. केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संस्थेला हा कापूस उपलब्ध करू न दिला जाणार आहे. या सर्व पृष्ठभूमीवर दूरदृष्टी ठेवून या कृषी विद्यापीठाने केलेले संशोधन आता कामी येत असल्याने प्रयत्न फळाला आल्याचे कापूस तज्ज्ञांचे मत आहे.