पश्चिम विदर्भात ३९ टक्के क्षेत्रावर पेरणी!
By admin | Published: June 29, 2015 02:03 AM2015-06-29T02:03:43+5:302015-06-29T02:03:43+5:30
पश्चिम विदर्भात ३९ टक्के क्षेत्रावर पेरणी; ५ लाख ९२ हजार २00 हेक्टरवर सोयाबीनचा पेरा.
अकोला : पश्चिम विदर्भातील (वर्हाड) पाच जिल्हय़ांत आजमितीस ३९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून, यात ५ लाख ९२ हजार २00 हेक्टरवर शेतकर्यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे. पाच जिल्हय़ांत आतापर्यंत (सरासरी १३२. २ मि.मी.) प्रत्यक्ष १७८. ३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
या पाच जिल्हय़ांतील खरिपाच्या एकूण पेरणीलायक क्षेत्र ३२ लाख ८३ हजार ८00 हेक्टर आहे. २६ जूनपर्यंत यातील १२ लाख ८५ हजार ५00 हेक्टर म्हणजे ३९ टक्के क्षेत्रावर शेतकर्यांनी विविध खरीप पिकांची पेरणी केली आहे. यवतमाळ जिल्हय़ात सर्वाधिक ३ लाख ८४ हजार ४00 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्या खालोखाल ३ लाख ४१ हजार ६00 हेक्टर ४६ टक्के क्षेत्रावर बुलडाणा जिल्हय़ातील शेतकर्यांनी पेरणी केली आहे. वाशिम जिल्हय़ात २,८000 हेक्टर ६८ टक्के , अमरावती १ लाख ३५ हजार १९ टक्के, तर अकोला जिल्हय़ात केवळ १ लाख ३६ हजार ५00 हेक्टर म्हणजेच २८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
पाच जिल्हय़ांत सुरुवातील कापसाने आघाडी घेतली होती. आता सोयाबीनचे क्षेत्र वाढले असून, शुक्रवारपर्यंत ५ लाख ९२ हजार २00 हेक्टरवर शेतकर्यांनी सोयबीनचा पेरा केला. कापसाचे क्षेत्रही ४ लाख ८८ हजार १00 हेक्टरवर पोहोचले आहे.