पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:26 AM2021-06-16T04:26:56+5:302021-06-16T04:26:56+5:30

सदर सभेमध्ये तालुका कृषी अधिकारी अकोट सुशांत शिंदे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना स्मार्ट कॉटन प्रकल्प, सोयाबीन पिकाचे उत्पादनवाढीसाठी अवलंब ...

Sowing should not be done unless there is sufficient rainfall | पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये

पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये

Next

सदर सभेमध्ये तालुका कृषी अधिकारी अकोट सुशांत शिंदे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना स्मार्ट कॉटन प्रकल्प, सोयाबीन पिकाचे उत्पादनवाढीसाठी अवलंब करण्याची अष्टसूत्री, बीजप्रक्रिया व त्याचे महत्त्व याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सर्व शेतकऱ्यांनी किमान ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. ८० ते १०० मिमी पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो व खंड पडल्यास पीक तक धरून राहू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. सभेला कृषी सहायक आकाश ठाकरे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक दीपक मोगरे, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल अडाणी व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Web Title: Sowing should not be done unless there is sufficient rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.