पेरण्या खोळंबल्या; शेतकऱ्यांना दमदार सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 01:44 PM2019-06-28T13:44:42+5:302019-06-28T13:44:51+5:30

अकोला : विदर्भात मान्सूनचा प्रवेश झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले; पण तो गेला कु ठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

Sowing stopped; Farmer Waiting for rain | पेरण्या खोळंबल्या; शेतकऱ्यांना दमदार सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा

पेरण्या खोळंबल्या; शेतकऱ्यांना दमदार सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा

googlenewsNext

- राजारत्न सिरसाट

अकोला : विदर्भात मान्सूनचा प्रवेश झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले; पण तो गेला कु ठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. १६ जून रोजी विदर्भात काही भागात पाऊस झाला, तेव्हापासून सार्वत्रिक पाऊसच झाला नसल्याने विदर्भातील ४९ लाख हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या आहेत.
राज्यात १४०.६९ ला, हेक्टर तर विदर्भात यातील ४९ लाख हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. १६ जून रोजी विदर्भासह राज्यातील काही भागात पाऊस पडला. पुन्हा पाऊस येईल, या आशेवर शेतकºयांनी बियाणे खरेदीसाठी बाजारात गर्दी केली. काही शेतकºयांनी पेरणीसुद्धा केली. १८ जूनपर्यंत १४०.६९ लाख हेक्टरपैकी ०.३९ लाख हेक्टर ०.२८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती. सार्वत्रिक पाऊसच होत नसल्याने शेतकºयांनी पेरण्या थांबविल्या आहेत. अमरावती विभागात ३२ लाख हेक्टरपैकी आजमितीस केवळ ३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. या तीन टक्क्यांमध्ये कापूस बियाणे पेरणी शेतकºयांनी केली. नागपूर विभागात तर एक टक्का पेरणी झाली नाही. नागपूर व वर्धा जिल्ह्यात काही भागात पाऊस झाल्याने शेतकºयांनी कापसाची धूळ पेरणी केली. ज्या शेतकºयांकडे संरक्षित सिंचनाची सोय आहे, त्यातील दोन-चार शेतकºयांनी भाताची रोपवाटिका टाकली.
दरम्यान, राज्यातील चित्र बघितल्यास खरीप हंगामातील पूर्वमशागतीची कामे सुरू आहेत, तर कोल्हापूर विभागात भात पिकाच्या धूळवाफ पेरणीची कामे सुरू झाली. सांगली जिल्ह्यात ७,६९७ तर कोल्हापूर जिल्ह्यात ११,९०० हेक्टरवर पेरणी झाली. सांगली जिल्ह्यात यावर्षी १३७ हेक्टरवर शेतकºयांनी सोयाबीन पेरणी केली. ठाणे व पुणे विभागात १०,१२५ हेक्टरवर भात व ३२९ हेक्टरवर भात रोपवाटिकेतील पेरणीची कामे झाली, तसेच ६८६ हेक्टरवर नाचणी रोपवाटिकेतील पेरणीची कामे झाली. कोकणात ठाणे ८६ हेक्टर, पालघर १०४ हेक्टर, रायगड २,६३९ हेक्टर, रत्नागिरी ४,८४७ हेक्टर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात २,४४९ हेक्टर भात रोपवाटिकेतील पेरणीची कामे झाली आहेत.


- दोन वर्षांपासून पूर्वेकडून मान्सून!
अरबी समुद्राकडून येणारा मान्सून हा स्थिर व कायम असतो. तथापि, विदर्भात गत दोन वर्षांपासून बंगालच्या उपसागराकडून मान्सून प्रवेश करीत आहे. त्यामुळे शेतकºयांनी पेरणी करताना काळजी घेणे गरजेचे असल्याचे कृषी तज्ज्ञांकरवी शेतकºयांना सल्ला दिला जात आहे.
- पश्चिम विदर्भात केवळ ३ टक्के कापूस बियाणे पेरणी झाली आहे.शेतकºयांना दमदार सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा आहे.
सुभाष नागरे,
विभागीय कृषी सह संचालक,
अमरावती.

 

Web Title: Sowing stopped; Farmer Waiting for rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.