सोयाबीनचे दर वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 06:25 PM2019-08-13T18:25:02+5:302019-08-13T18:25:16+5:30
मागीलवर्षी हमीदरापेक्षा जास्त दर सोयाबीनला मिळाले,यासाठी तेलबिया वाणावरवर आयात कर वाढविल्याचा परिणाम सांगण्यात येत आहे.
अकोला : सोयाबीनचा पेरा यावर्षी घटला, किड,रोगांसह तणाने हे पीक व्यापले असून, उत्पादन घटण्याची शक्यता आहे. परिणामी उद्योगांना सोयाबीन आयात करावे लागणार असल्याने दर वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
यावर्षी राज्यात ३४ लाख ५३ हजार ७९६ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत ३ ते ४ टक्के हा पेरणीचा आकडा कमी आहे. असे असले तरी विदर्भातील शेकडो शेतकऱ्यांनी पावसाअभावी सोयाबीन पीक करपल्याने हजारो हेक्टरवर वखर,नांगर फिरविला आहे.मागील पंधरा दिवसापासून तुरळक पाऊस सुरू होता.परिणामी सोयबीनच्या शेतात प्रंचड तणाचा उद्रेक झाला असून, त्यावर तणनाशकदेखील निष्प्रभावी ठरत असल्याने तणाचे व्यवस्थापक करणे कठीण झाले आहे. ढगाळ व पाऊस हे वातावरण किड,रोग आणि तणवाढीसाठी पोषक ठरले अनेक ठिकाणी पीक पिवळेही पडले आहे. हजारो हेक्टर शेतात सोयाबीन पिकापेक्षा तणांची उंची वाढली आहे. हिरवी,तंबाखुची पाने खाणाºया अळीसह खोडमाशी,चंक्रीभुंगा अळ््यांनी आक्रमण केले आहे.दोन दिवस पावसाने उघडीप दिली १३ आॅगस्टपासून पुन्हा ढगाळ वातावरण व तुरळक स्वरू पाचा पाऊस सुरू झाल्याने सोयाबीन पिकावर प्रतिकुल परिणाम होत असून,उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.यामुळेच यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मागीलवर्षी हमीदरापेक्षा जास्त दर सोयाबीनला मिळाले,यासाठी तेलबिया वाणावरवर आयात कर वाढविल्याचा परिणाम सांगण्यात येत आहे. मागच्यावर्षी सोयाबीनचे प्रतिक्ंिवटल दर हे ३,७०० ते ३,८०० रू पयांवर पोहोचले होते.यावर्षी आतापर्यंत हे दर सरासरी प्रतिक्ंिवटल ३,५७५ रू पये ते जास्तीचे दर ३,६२५ रू पये आहेत.
- एकतर जूलै महिन्यात उशिरा सोयाबीनची पेरणी झाली त्यानंतर काही ठिकाणी भरपूर पाऊस पडल्याने पीक कुजले विदर्भात दिर्घ दडी मारल्याने सोयाबीन करपले काही थोडासा भाग सोडला तर सोयाबीन उत्पादन मोठ्याप्रमाणात घटण्याचीच शक्यता आहे.यावर्षी तर उद्योजकांना सोयाबीन आयात करावे लागणार असल्याने सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता आहे.
डॉ.शरदराव निंबाळकर,
माजी कुलगुरू ,
डॉ. पंदेकृवि,अकोला.