सोयाबीनचे क्षेत्र वाढणार ; महाबीजने केले अतिरिक्त बियाण्यांचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 06:59 PM2018-05-03T18:59:30+5:302018-05-03T18:59:30+5:30
अकोला : बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे मागीलवर्षी कापूस उत्पादन घटल्याने यावर्षी सोयाबीन पेरणी क्षेत्र वाढीची शक्यता आहे.
अकोला : बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे मागीलवर्षी कापूस उत्पादन घटल्याने यावर्षी सोयाबीन पेरणी क्षेत्र वाढीची शक्यता आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) चार लाख पन्नास हजार क्विंटल सोयाबीन बियाणे विक्रीचे नियोजन केले. गरज भासल्यास आणखी पन्नास हजार म्हणजे एकूण पाच लाख क्विंटल बियाणे उपलब्ध केले जाणार आहे.
महाबीजने येत्या खरीप हंगामातील विविध पिकांच्या पेरणीसाठी लागणाऱ्या ५ लाख ९७ हजार ७७४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन केले आहे. आजमितीस ५ लाख ५७ हजार ९८९क्विंटल बियाणे महाबीजकडे उपलब्ध आहे. सद्या बाजारात वाढलेले सोयाबीनचे दर आणि पुढील वर्षांच्या तूटीचा अंदाज घेऊन सर्वाधिक ४ लाख ५० हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याचे महाबीजने नियोजन केले. यातील ४ लाख ३० हजार क्विंटल सद्या उपलब्ध आहे. मागील दोन तीन वर्षापासून तुरीचे क्षेत्र वाढल्याने यावर्षी १६,५४५ क्विंटल ल तूर बियाणे उपलब्ध केले जाणार आहे.यामध्ये दहा वर्षाआतील ४ हजार २५ क्विंटल बियाणे अनुदानावर उपलब्ध असून,उर्वरित १० वर्षावरील १२,५२० क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. उडीद २१ हजारक्विंटल आहे.यातील १० वर्षावरील २०,४४५ क्विंटल बियाणे अनुदानावरील आहे.