पश्चिम विदर्भात सोयाबीनचे क्षेत्र पोहोचले ६६ टक्क्यांवर!
By admin | Published: July 6, 2016 01:22 AM2016-07-06T01:22:56+5:302016-07-06T01:22:56+5:30
पश्चिम विदर्भात ८ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. कापसाचे क्षेत्र मात्र घटले.
अकोला: पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये सार्वत्रिक स्वरू पाच्या पावसाला सुरुवात झाल्याने पेरणीची गती वाढली असून, ५ जुलैपर्यंत ७0 टक्क्यांपर्यंत पेरण्या आटोपल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ६६ टक्के म्हणजे ८ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. कापूस या नगदी पिकाचे क्षेत्र मात्र घटले आहे; परंतु यवतमाळ या एका जिल्हय़ात कापसाचे क्षेत्र वाढले आहे.
पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती व यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामातील पेरणीलायक क्षेत्र ३२ लाख ७५ हजार २00 हेक्टर आहे, मागील आठवड्यापासून बर्यापैकी पाऊस होत असल्याने पेरणीला वेग आला आहे. कृषी विभागाच्या पेरणी अहवालावरू न यावर्षीही सोयाबीनचे क्षेत्र वाढल्याचे चित्र आहे. सोयबीन ८ लाख ३४ हजार ६00 तर कापूस केवळ ५८ टक्के म्हणजे ६ लाख ३५ हजार ६00 हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक यवतमाळ जिल्ह्यात ३ लाख ७६ हजार १00 हेक्टर क्षेत्र कापसाचे आहे. उर्वरित जिल्हय़ात मात्र सोयाबीन आघाडीवर आहे.
कापूस हे विदर्भाचे नगदी पीक; परंतु उत्पादनावर आधारित दर मिळत नसल्याने अलीकडच्या दहा वर्षात हे पीक मागे पडले असून, याची जागा सोयाबीनने घेतली आहे. यावर्षी ५ जुलैपर्यंंत बुलडणा जिल्हय़ात २ लाख ७ हजार ३00 हेक्टरवर सोयाबीन तर ८८ हजार हेक्टरवर कापसाची पेरणी शेतकर्यांनी केली आहे. अकोला जिल्ह्यात ८६ हजार ३00 हेक्टर सोयबीन तर कापूस ४२ हजार ७00 हेक्टर, वाशिम सोयाबीन १ लाख ६६ हजार ९00 हे. आणि कापूस केवळ ९ हजार ६00 हे., अमरावती सोयाबीन १ लाख ८१ हजार ५00 हे. तर कापूस १ लाख १८ हजार ९00 हेक्टर पेरणी झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात मात्र कापूस सर्वाधिक ३ लाख ७६ हजार १00 हे. तर सोयाबीन १ लाख ९२ हजार ६00 हेक्टरवर पेरण्यात आले.
दरम्यान, सध्या सर्वत्र पाऊस सुरू असल्याने काही भागातील पेरण्या खोळंबल्या आहेत.