सोयाबीनची आवक वाढली; दर पडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:10 PM2019-11-23T12:10:49+5:302019-11-23T12:10:54+5:30
सोयाबीनचे प्रतिक्ंिवटल दर २ हजार ८०० रुपयांपर्यंत घटले आहेत.
अकोला : बाजारात सोयाबीनची आवक वाढली आहे; परंतु व्यापाऱ्यांनीही प्रतवारीचे निकष कडक केल्याने सोयाबीनचे प्रतिक्ंिवटल दर २ हजार ८०० रुपयांपर्यंत घटले आहेत.
गत आठवड्यापासून सोयाबीनची आवक वाढली असून, अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज सात हजार क्ंिवटलवर आवक सुरू आहे. शुक्रवारी ही आवक ७ हजार ३०५ क्ंिवटल होती. वाशिम बाजारात समितीमध्ये कमीत कमी प्रतिक्ंिवटल दर ३,२५० रुपये होते. आवक ६ हजार १५० क्विंटल होती. चांगल्या पिवळ्या सोयाबीनला अकोल्यात प्रतिक्ंिवटल ३७०० ते ३८०० रुपये तर वाशिम येथे ४००० रुपये क्विंटलपर्यंत दर होते. यावर्षी अतिपावसाने सोयाबीन काळे पडले असून, प्रतवारी घसरल्याच्या नावाखाली बाजारात सोयाबीनचे दर घटले आहेत.