पांढुर्णा परिसरामध्ये सोयाबीन पिके करपली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:24 AM2021-07-07T04:24:31+5:302021-07-07T04:24:31+5:30
मागच्या वर्षी पांढुर्णासह परिसरामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पिके हातातून गेली होती. मात्र यावर्षी पाऊस भरपूर प्रमाणामध्ये पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना ...
मागच्या वर्षी पांढुर्णासह परिसरामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पिके हातातून गेली होती. मात्र यावर्षी पाऊस भरपूर प्रमाणामध्ये पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. यंदा तरी पीकपाणी चांगले राहील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु पेरणी करून पंधरा दिवस उलटले तरी, पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे यंदासुद्धा दुष्काळी परिस्थिती निर्माण होते की काय, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.
पीक विमा देण्याची मागणी
पातूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या आटोपल्या आहेत. मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे पिके हातातून गेली. यावर्षी पिकांसाठी पाणी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करावा. अशी मागणी होत आहे.
सिंचनाची सोय, परंतु पाणी नाही
पांढुर्णा परिसरामधील प्रत्येक गावामध्ये काही शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे. मात्र नदी-नाले, विहीर यांना पाणी नसल्याने शेतातील पिकांना पाणी कसे द्यावे. पीक कसे जगवावे, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.