सोयाबीन लागवड क्षेत्रात वाढ होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:18 AM2021-04-25T04:18:20+5:302021-04-25T04:18:20+5:30
सोयाबीन क्षेत्रानुसार एकूण १ लाख ५९ हजार ५२५ क्विंटल बियाण्याची गरज आहे. ग्राम बीजोत्पादन मोहिमेद्वारे तसेच शेतकऱ्यांनी स्वतः राखून ...
सोयाबीन क्षेत्रानुसार एकूण १ लाख ५९ हजार ५२५ क्विंटल बियाण्याची गरज आहे. ग्राम बीजोत्पादन मोहिमेद्वारे तसेच शेतकऱ्यांनी स्वतः राखून ठेवलेले बियाणे स्थानिक पातळीवर एकूण १ लाख २७ हजार २२६ क्विंटल बियाणे उपलब्ध होऊ शकेल. उर्वरित बियाण्यांची गरज भागविण्यासाठी ३३ हजार ९९९ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. महाबीजकडे २५ हजार क्विंटल, राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडे ३ हजार क्विंटल, खासगी कंपन्यांकडे ५ हजार ९९९ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली.
--बॉक्स--
शेतकऱ्यांच्या भरवश्यावर हंगाम
सर्वाधिक बियाणे हे शेतकऱ्यांनी स्वत:कडे राखून ठेवलेले असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात सव्वा ते दीड लाखांच्या जवळपास बियाणे शेतकऱ्यांकडे असल्याचे सोयाबीन बियाण्यांच्या नियोजनात देण्यात आले आहे. याउलट महामंडळ व कंपन्यांकडून कमी प्रमाणात बियाणे मिळणार आहे.
--बॉक्स--
खरिपात प्रस्तावित क्षेत्र
२,१२,७००
आवश्यक सोयाबीन बियाणे
१,५९,५२५
--बॉक्स--
सरासरी पावणे दोन लाख क्षेत्र
जिल्ह्यात सोयाबीनचे सरासरी १ लाख ७३ हजार ५५८ हेक्टर क्षेत्र आहे, तसेच सरासरी ६० हजार ८२३ हेक्टर बियाण्यांची विक्री झाली होती.