पातूर तालुक्यात सोयाबीन, कपाशीवर किडींचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 08:22 PM2017-08-22T20:22:34+5:302017-08-22T20:23:55+5:30
शिर्ला : पातूर तालुक्यात ३१ हजार हेक्टरमधील सोयाबीन पिकावर सध्या हिरवी उंट अळी आणि चक्रीभुंगा, तर कपाशीवर गुलाबी रंगाच्या बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. ही बाब कृषी अधिकारी आणि शास्त्रज्ञांनी २१ ऑगस्ट रोजी केलेल्या पीक पाहणी दौर्यात निदर्शनास आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

पातूर तालुक्यात ३१ हजार हेक्टरवर कमी-अधिक प्रमाणात सोयाबीन, कपाशी लागवड शेतकर्यांनी केली आहे. यंदा अल्प प्रमाणात पडणार्या पावसामुळे बहुतांश शेतकर्यांवर तिबार पेरणीचे संकट आले आहे. पातूर तालुक्यात पीक परिस्थितीचा पाहणी दौरा करण्यासाठी आलेल्या डॉ. पंदेकृविचे एम. एस. ठाकरे, त्यांची चमू तसेच पातूर, बाश्रीटाकळी, बाळापूर तालुका कृषी अधिकार्यांनी सोमवारी पातूर तालुक्यातील विविध प्रक्षेत्रावर जाऊन पीक पाहणी केली. त्यांना सोयाबीनवर तंबाखूची पाने खाणारी हिरवी उंट अळी व चक्रीभुंगा तर कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात झाला असल्याचे आढळून आले आहे.
पावसाचे अपुरे आणि सौम्य प्रमाण यास कारणीभूत असल्याचे मत चमूने ‘लोकमत’कडे व्यक्त केले. तिबार पेरणीमुळे आर्थिक ओझ्याने दबलेल्या शेतकर्यांसमोर विविध प्रकारच्या किडींच्या प्रादुर्भावाचे आव्हान उभे ठाकले असल्याने ते पिकाच्या नुकसानास कारणीभूत ठरत आहे.