अकोला जिल्ह्यात १०३ हेक्टरवर उगवले नाही सोयाबीन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 09:55 AM2020-06-26T09:55:54+5:302020-06-26T09:56:03+5:30
बियाणे उगवले नसलेल्या शेतांमधील नुकसानाचे पंचनामे कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात सद्यस्थितीत खरीप पेरण्या सुरू असून, पेरणीनंतर १०३ हेक्टरवरील सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी १४९ शेतकऱ्यांनी २४ जूनपर्यत करण्यात आल्या आहेत. त्यानुषंगाने बियाणे उगवले नसलेल्या शेतांमधील नुकसानाचे पंचनामे कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आले आहेत.
यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणीचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यापैकी २४ जूनपर्यंत ८६ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली असून, उर्वरित क्षेत्रावरील पेरणी सुरू आहे; परंतु १३ ते १७ जून या कालावधीत जिल्ह्यात पेरणी झालेल्या क्षेत्रावरील सोयाबीन उगवलेच नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून कृषी विभागाकडे प्राप्त होत आहेत. जिल्ह्यातील १०३ हेक्टर क्षेत्रावर पेरलेले सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या १४९ शेतकºयांच्या तक्रारी २४ जूनपर्यंत जिल्हा कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. शेतकºयांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पृष्ठभूमिवर जिल्ह्यात पेरणीनंतर सोयाबीनचे बियाणे उगवले नसलेल्या शेतांमधील पंचनामे करण्याचे काम कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आहे.
जिल्ह्यात २४ जूनपर्यंत ८६ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. त्यापैकी १०३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या १४९ शेतकºयांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार सोयाबीन उगवले नसलेल्या शेतांमधील पंचनामे करण्याचे काम कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे.
-मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी.