सोयाबीनचे पंचनामे संथ गतीने; मदत अधांतरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 10:40 AM2020-07-08T10:40:03+5:302020-07-08T10:40:22+5:30
सोयाबीन उगवले नसलेल्या शेतातील पंचनामे करण्याचे काम कृषी विभागामार्फत संथगतीने सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्यातील विविध भागात पेरणीनंतर सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी वाढतच असून, सोयाबीन उगवले नसलेल्या शेतातील पंचनामे करण्याचे काम कृषी विभागामार्फत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामातील पेरण्या सद्यस्थितीत सुरू आहेत. त्यामध्ये अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यासह राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये महाबीज आणि इतर विविध खासगी बियाणे कंपन्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून कृषी विभागाकडे करण्यात येत आहेत. सोयाबीन उगवले नसलेल्या शेतकºयांना दुबार पेरणीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे.
सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी वाढत असतानाच, बियाणे उगवले नसलेल्या शेतांमधील पंचनामे करण्याचे कृषी विभागामार्फत सुरू असलेले काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे बियाणे उगवले नसलेल्या शेतकºयांना नुकसान भरपाईची मदत मिळणार केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
खासगी कंपन्यांकडून भरपाईवर प्रश्नचिन्ह!
शासनाच्या निर्देशानुसार सोयाबीन बियाणे उगवले नसलेल्या शेतकºयांना बियाणे बदलून देण्यासंदर्भात ‘महाबीज’कडून कार्यवाही सुरू करण्यात आली असली तरी; खासगी बियाणे कंपन्यांकडून मात्र शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही. त्यामुळे सोयाबीन बियाणे उगवले नसलेल्या शेतकºयांना खासगी बियाणे कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
२,४७३ तक्रारी; पंचनामे ४३०!
४अकोला जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या २ हजार ४७३ शेतकºयांकडून ६ जुलैपर्यंत कृषी विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या असून, त्यापैकी केवळ ४३० शेतकºयांच्या तक्रारींचे सोयाबीन बियाणे उगवले नसल्यासंदर्भात पंचनामे करण्यात आले आहेत.