सोयाबीनचे दर ७,७०० रुपये क्विंटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:23 AM2021-04-30T04:23:02+5:302021-04-30T04:23:02+5:30

अकोला : बाजार समितीत सोयाबीनची आवक सुरू आहे. बुधवारी १ हजार १३६ क्विंटल आवक झाली होती. सोयाबीनला कमीत कमी ...

Soybean price is Rs. 7,700 per quintal | सोयाबीनचे दर ७,७०० रुपये क्विंटल

सोयाबीनचे दर ७,७०० रुपये क्विंटल

Next

अकोला : बाजार समितीत सोयाबीनची आवक सुरू आहे. बुधवारी १ हजार १३६ क्विंटल आवक झाली होती. सोयाबीनला कमीत कमी ६ हजार २००, जास्तीत जास्त ७ हजार ७०० तर सर्वसाधारण ६ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.

-----------------------------------------------

महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पेट्रोल मिळेना !

अकोला : महामंडळाच्या एसटी बसेस अत्यावश्यक सेवेसाठी सुरू आहे. वाहक-चालक जीवाची पर्वा न करता कर्तव्यावर हजर आहे ; मात्र या कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर ये-जा करण्यासाठी खासगी वाहनामध्ये पंपावरून पेट्रोल मिळत नसल्याची अनेक कर्मचाऱ्यांची तक्रार आहे.

-------------------------------------------------

सिंचनाला गती

अकोला : शेतातील विविध प्रकारच्या पिकांना सिंचन करण्याच्या कामाला गती आली आहे. पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी उन्हाळी पिके घेतली आहेत. चांगले उत्पादन यावे, यासाठी शेतकरी सर्व दृष्टीने प्रयत्न करीत आहेत.

--------------------------------------------------

गतिरोधक देताहेत अपघाताला निमंत्रण

अकोला : शहराच्या विविध भागांत तयार करण्यात आलेले ओबडधोबड गतिरोधक अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहे. गतिरोधकाच्या नावाखाली उंचवटे तयार करून ठेवण्यात आले आहे. त्यावरून वाहन उसळून शारीरिक त्रास होत आहे. अनेक ठिकाणी हा प्रकार करून ठेवला आहे. त्रास होणार नाही, अशा पद्धतीने गतिरोधकाची निर्मिती करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Soybean price is Rs. 7,700 per quintal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.