सोयाबीनचे दर ३०० रुपयांनी गडगडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 11:49 AM2020-01-25T11:49:11+5:302020-01-25T11:49:54+5:30
बाजार दर कमी झाल्याने अकोला बाजार समितीतील आवक कमी होऊन १ हजार क्विंटलवर खाली आली आहे.
अकोला : सोयाबीनच्या प्रति क्विंटल दरात ३०० रुपयांनी घट झाली असून, बाजारात आवकही कमी झाली आहे. गत आठवड्यापासून सोयाबीनच्या दरात चढ-उतार सुरू आहे. हे दर प्रति क्विंटल ४,२०० रुपयांवर पोहोचले होते. आता घटून सरासरी ३,९०० रुपयांवर येऊन ठेपले आहेत.
गत आठवड्यात अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची दररोज बºयापैकी आवक सुरू होती. या आठवड्यात आवक घटली असून, सरासरी दररोज १००० क्विंटल आवक आहे. दर सरासरी प्रतिक्विंटल ३,९०० रुपये असून, जास्तीत जास्त ३,९५० तर कमीत कमी दर ३ हजार रुपये होते. दरम्यान, बाजार दर कमी झाल्याने अकोला बाजार समितीतील आवक कमी होऊन १ हजार क्विंटलवर खाली आली आहे.
दरम्यान, तुरीचे दरही सरासरी पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत आहेत. मुगाच्या दरात गत आठवड्याच्या तुलनेत ५०० रुपयांनी घटले असून, आजमितीस सरासरी प्रति क्विंटल ६,५०० रुपये आहेत. उडीद दरही सरासरी ५,५०० रुपये प्रति क्विंटल आहेत. हरभºयाचे दर कमी असून, हे सरासरी दर प्रति क्विंटल ३,७५० रुपये आहेत.