सोयाबीनचे दर ७०० रुपयांनी कोसळले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 10:34 AM2021-07-05T10:34:14+5:302021-07-05T10:34:31+5:30

Soybean prices fall by Rs 700 in Akola : शनिवारी दरात घसरण होऊन ७,३०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले.

Soybean prices fall by Rs 700 | सोयाबीनचे दर ७०० रुपयांनी कोसळले!

सोयाबीनचे दर ७०० रुपयांनी कोसळले!

googlenewsNext

अकोला : खरीप हंगाम सुरू असल्याने बाजार समितीत आवक कमी आहे; परंतु काही व्यापारी व शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेल्या सोयाबीनची आवक सुरू आहे. काही महिन्यांपासून सोयाबीनला उच्चांकी दर मिळत आहे. बाजार समितीत उच्च दर्जाच्या सोयाबीनला शुक्रवारी आठ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला; मात्र शनिवारी दरात घसरण होऊन ७,३०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले. गेल्या खरीप हंगामात सोयाबीनचे पीक अतिपावसामुळे खराब झाले. परिणामी, उत्पादन घटले व बाजार समितीत मागणी वाढली; परंतु बाजार समितीत अपेक्षित आवक होत नसल्याने दरात वाढ झाली. यंदा पहिल्यांदा सोयाबीनचा दर विक्रमी आठ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला होता; मात्र या दराचा फारसा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकला नाही. बहुतांश शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना कमी दरात सोयाबीन विकले. काही शेतकऱ्यांनी बीजोत्पादनासाठी राखून ठेवले. खरीप हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू आहे. सध्या बाजार समितीत व्यापाऱ्यांकडे शिल्लक असलेले सोयाबीन विक्रीसाठी येत आहे. शुक्रवारी बाजार समितीत सोयाबीनला आठ हजार रुपये दर मिळाला; मात्र हे दर कायम राहिले नाही. दुसऱ्याच दिवशी शनिवारी ७०० रुपये प्रतिक्विंटलने दरात घसरण झाली. काही दिवस ७१००-७२०० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

आवकही मोजकीच

खरीप हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक नाही. त्यामुळे बाजार समितीत मोजकीच आवक होत आहे. मागील सहा दिवसांमध्ये बाजार समितीत १,५३१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली.

Web Title: Soybean prices fall by Rs 700

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.