सोयाबीनच्या दरात चढ-उतार!

By admin | Published: September 21, 2016 02:07 AM2016-09-21T02:07:16+5:302016-09-21T02:07:16+5:30

मंगळवारी दोनशे रुपयांनी दरवाढ, गव्हाचे दर पाचशे रुपयांनी घसरले.

Soybean prices fluctuate! | सोयाबीनच्या दरात चढ-उतार!

सोयाबीनच्या दरात चढ-उतार!

Next

अकोला, दि. २0 - सोयबीन काढणी हंगाम तोंडावर आला असताना मागील आठवड्यापासून सोयाबीनचे दर घसरले आहेत; पण २0 सप्टेंबर रोजी या दरात किंचितशी सुधारणा झाली असून, जास्तीत जास्त ३,३00 तर सरासरी दर हे ३,१९0 रुपये झाले.
यावर्षी पाऊस वेळेवर आल्याने शेतकर्‍यांनी या दोन्ही पिकांची पेरणी केली; पण काढणी हंगाम सुरू होताच मुगाचे दर कोसळले आहेत. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुगाला सध्या सरासरी ४,६२५ रुपये प्रतिक्विंटल भाव आहे. मुगापेक्षा उडिदाची पेरणी कमी आहे. त्यामुळे उडिदाचे प्रतिक्विंटल दर हे सरासरी ६,८00 रुपये आहेत. हे दर १00 रुपयांनी कमी झाले आहेत. यावर्षी सोयाबीनची पेरणी मोठय़ा प्रमाणात झाली आहे; पण काढणी हंगाम जवळ येताच बाजारात मात्र दर कोसळले होते. हे दर २,८00 रुपयांपर्यंंंंत खाली आले होते. मंगळवारी या दरात सुधारणा झाली असून, सोयाबीनला प्रतिक्विंटल कमीत कमी ३,0७५ जास्तीत जास्त ३,३00 तर सरासरी दर हे ३,१९0 रुपये आहेत. हरभर्‍याचा हंगाम आणखी चार ते पाच महिने पुढे आहे.
मागील आठवड्यात हरभर्‍याचे सरासरी दर प्रतिक्विंटल आठ हजारांपर्यंंंत पोहोचले होते. आजमितीस हे दर ५00 रुपयांनी घसरले असून, ७,५00 रुपये प्रतिक्विंटल आहेत. तुरीचे दर सध्या कमीत कमी सहा हजार, जास्तीत जास्त ६,७५0 तर सरासरी ६,३७५ रुपये प्रतिक्विंटल एवढे आहेत. ज्वारीला कमीत कमी १,४२५ जास्तीत जास्त १,५00 तर सरासरी दर हे प्रतिक्विंटल १,४६0 रुपये आहेत. गहू धान्याचे दर सरासरी १,५00 रुपये प्रतिक्विंटल असून, कमीत कमी १,५00 तर जास्तीत जास्त १,५00 रुपये आहेत.

धान्याची आवक
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी सर्वाधिक १,७३५ क्विंटल मुगाची आवक होती, तर उडीद १,७0१ क्विंटल विक्रीस आला. तूर १२९ क्विंटल, सोयाबीन १६0 क्विंटल तसेच हरबरा ७९ क्विंटल, गहू १0 तर ज्वारी ११ क्विंटल विक्रीस आली होती.

Web Title: Soybean prices fluctuate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.